Amitabh Bachchan : यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान

Amitabh Bachchan : यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान

मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा 24 एप्रिल रोजी पार पडला. दीनानाथ नाट्यग्रह येथे हा सोहळा पार पडला असून या वर्षीचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला. उषा मंगेशकर यांच्या हस्ते ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला. तसेच, प्रदीर्घ नाट्य चित्रपट सेवेचा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आला. (Amitabh Bachchan receives Lata Deenanath Mangeshkar Award 2024)

पुरस्कारानंतर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकरांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. “लतादीदींनी मला आणि माझ्या कुटुंबाला नेहमी प्रेम दिले. मी त्यांच्यासोबत स्टेजवर कार्यक्रमही केले. स्टेजवर मी पहिले गाणे लतादीदी यांच्या सोबत गायले. तेही न्यूयॉर्क येथील एका भव्य कार्यक्रमात. बाबूजी म्हणायचे लतादीदींचा आवाज म्हणजे मधाची धार. मधाची धार कधीच तुटत नाही. दीदींचा स्वरही अगदी तसाच आहे कधीही न तुटणारा”, असे अमिताब बच्चन म्हणाले.

आणखी कोणते पुरस्कार प्रदान?

34 वर्षात 212 व्यक्तींना पुरस्कार प्रदान

गेली 34 वर्षे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था पुण्यात कार्यरत आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही संस्था मंगेशकर कुटुंबियांनीच स्थापन केली आहे. त्याचा मुळ उद्देश हा दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिनी (24 एप्रिल) प्रतिवर्ष साजरा करणे हा आहे. मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत.

या दिवशी पुरस्कार सोहळ्यानंतर संगीत तथा नाट्य, नृत्य असे कलाक्षेत्रातील विविध कार्यक्रम केले जातात. तसेच 2022 वर्षापासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्याचे सर्व विश्वस्तांनी ठरविले आहे. त्यानुसार 24 एप्रिल 2022 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला होता व 24 एप्रिल 2023 रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार दिला होता.


हेही वाचा – Alia Bhatt- आलिया भट्ट राहाच्या जन्मानंतर दर आठवड्याला घेते थेरपी

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 25, 2024 8:37 AM
Exit mobile version