कोरोनाला हरवून घरी आल्यावर ‘महानायकाने’ पहिला फोटो केला शेअर आणि म्हणाले…

कोरोनाला हरवून घरी आल्यावर ‘महानायकाने’  पहिला फोटो केला शेअर आणि म्हणाले…

अमिताभ बच्चन

शहेनशहा अमिताभ बच्चन कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. कोरोनाची लढाई जिंकल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव चाहते करत आहेत. आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांसाठी बिग बी नेहमी काही ना काही सरप्राईझ देत असतात. हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी आपला सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या झक्कास सेल्फीला काही तासातच लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.

११ जुलैच्या रात्री अमिताभ बच्चन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना लगेचच नानवटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. अमिताभ यांचा कोरोनाची लागण झाली ऐकताच त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना लवकर बरं वाटावं यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. अमिताभ बच्चन यांच्या नंतर मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय आणि नात आराध्यालाही कोरोनाची लागण झाली होती.

२ ऑगस्टला अमिताभ यांना डिस्चार्ज देण्यात आला. या बातमीने सगळेच चाहते सुखावले. मात्र कोरोनाला हरवून परत आल्यानंतर आज अमिताभ बच्चन यांच दर्शन एका झक्कास सेल्फीतून चाहत्यांना घडलं. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहीलं आहे की, ‘बहुत कम लोग जानते हैं , की वो बहुत कम जानते हैं ‘

First Published on: August 8, 2020 3:38 PM
Exit mobile version