फॉलोअर्स वाढण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी बिकिनीतला शेअर केला फोटो

फॉलोअर्स वाढण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी बिकिनीतला शेअर केला फोटो

फॉलोअर्स वाढण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी बिकिनीतला शेअर केला फोटो

लॉकडाऊनच्या काळात बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह दिसत आहेत. नुकताच त्यांनी ‘महान’ या चित्रपटाला ३७ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह काही गोष्टी त्यांनी शेअर केल्या आहे. इन्स्टाग्रामवर लोकप्रियता कशी मिळवायची याबाबत त्यांनी चाहत्यांना माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करताना लिहिले आहे की, कोणीतरी मला इन्स्टाग्रामवर माझे फॉलोअर्स वाढत का नाही आणि ते कसे वाढवता येतात? मी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय का होत नाही? इतर तरुणांप्रमाणेच त्याने मला सांगितले की, बिकिनीमध्ये फोटो शेअर करत नाही. यामुळे तुम्ही लोकप्रिय होत नाही आहात. त्यामुळे आज ‘महान’ या चित्रपटानिमित्ताने फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटो अमिताभ बच्चन यांनी बिकिनी घातली नाही आहे. ‘महान’ चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो आहे. या चित्रपटात अमिताभ यांनी तीन भूमिका केल्या आहेत आणि आज या चित्रपटाला ३७ वर्ष पूर्ण झाले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करताना ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ‘महान’ या चित्रपटात गुरू, अमित, शंकर अशा तीन भूमिका केल्या होत्या. १९८३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेत्री परवीन बाबी, वहीदा रेहमान, झीनत अमान, अभिनेता अमजद खान होते.


हेही वाचा – CoronaVirus: न्यू डेव्हलपमेंट बॅंक १५ अब्ज डॉलर्स देणार, भारतासह या देशांना मिळणार मदत!


 

First Published on: April 29, 2020 12:42 PM
Exit mobile version