लॉकडाऊनमध्ये अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘हा’ भन्नाट फोटो, आणि म्हणाले…

लॉकडाऊनमध्ये अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘हा’ भन्नाट फोटो, आणि म्हणाले…

अभिनेते अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटांसह आपल्या ट्वीटमुळेही बऱ्याचदा चर्चेत असतात. बिग बींच्या ट्विटची दखल अनेकांकडून नेहमीच घेतली जाते. तसेच त्यांचे ट्विट सोशल मीडियावर सर्वाधिक वाचले देखील जातात. लॉकडाऊन दरम्यान ट्वीटद्वारे अनेकदा कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसताय.

दरम्यान, अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले आहे, जे खूप व्हायरल होत असून चांगलेच चर्चेत आहे. यावेळी बिग-बींनी स्वत:चा फोटो शेअर केला असून “चले भैया जिम.” असे कॅप्शन दिले आहे. ट्विटरवर अमिताभ बच्चन हे आपले आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात, तर कधीकधी सद्यस्थितीविषयी आपले मतही सोशल मीडियावर व्यक्त करतात.

सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आपल्या घरात बंधिस्त आहे. असे असताना अमिताभ बच्चन आपल्या ट्विटद्वारे जिममध्ये जाण्याविषयी बोलताना दिसताय. यावेळी अमिताभ बच्चान यांनी असे सांगितले की, लॉकडाऊनमध्ये जिमसाठी बाहेर जाण्याची गरज नाही, तर ती जिम आपल्या घरातच आहे. यावरून बॉलिवूडच्या या महानायकाने असे ट्वीट केले की, “चलो भैया जिम, बाद में मिलते हैं. जिम यहीं है, घर के बाहर नहीं.” नेटकरी या बच्चान यांच्या ट्विटवर बऱ्याच प्रतिक्रिया देत असून त्या फोटोला पसंती देत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ते लवकरच बॉलिवूडमध्ये ‘चेहरे’, ‘झुंड’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘गुलाबो-सीताबो’ असे चित्रपट आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येणार आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींच्या आगामी झुंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, त्याला देखील चाहत्यांची चांगला प्रतिसाद दिला.


ठरलं! ‘शकुंतला देवी’ चित्रपटही होणार डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

 

First Published on: May 16, 2020 4:37 PM
Exit mobile version