अमोल कोल्हेंची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात

अमोल कोल्हेंची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात

उभा महाराष्ट्र ज्या मालिकेच्या प्रेमात पडल्याचं पाहायाला मिळतो ती मालिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी!! आज देश – विदेशासह प्रत्येक मराठी घरात स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पाहताना लोक दिसून येतात. या मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले दिसतात. शिवाजी महाराज, शंभू राजे, अनाजी पंत, सोमाजी, सोयराबाई, पुतळाबाई, राणुआक्का अशी एक ना अनेक नावं सध्या या मालिकेतून प्रत्येक घराघरात पोहोचलेली पाहायाला मिळत आहेत. मालिकेतील बाल कलाकारांनी देखील त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. कालच या मालिकेमध्ये आणखी एका बाल कलाकाराची एन्ट्री पाहायाला मिळाली. ती म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहितेंची कन्या ताराची !! ही भूमिका कुणी साकारली आहे याचा तुम्ही केव्हा विचार केला आहे? तर, अमोल कोल्हेंची कन्या आद्या कोल्हेनं ताराची भूमिका साकारली आहे.

आद्याची ही पहिलीच मालिका आहे. यासाठी आद्यानं खूप मेहनत देखील घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी फेसबुकवरून आद्याच्या पदार्पणाविषयी माहिती देखील दिली होती. अखेर सोमवारच्या भागात ताराचा रूपात आद्याची एन्ट्री पाहायाला मिळाली

First Published on: December 25, 2018 3:30 PM
Exit mobile version