‘राजी’नंतर आता अमृता खानविलकर हिंदी वेबसीरिजमध्ये

‘राजी’नंतर आता अमृता खानविलकर हिंदी वेबसीरिजमध्ये

अमृता खानविलकरची वेबसिरीजमधील झलक

धर्मा प्रॉडक्शन्सच्या ‘राजी’ सिनेमात मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमृता खानविलकरने ह्या भूमिकेतून बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय. अमृताच्या ह्या भूमिकेला फक्त चाहत्यांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही दाद मिळाली. राजीच्या शालीन आणि घरंदाज गृहिणीनंतर आता अमृता आपल्या चाहत्यांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. अमृताचा लवकरच डिजीटल दूनियेत डेब्यू होत आहे.

ग्रे शेड भुमिकेची उत्सुकता

अमृताच्या नव्या वेबसीरिजमध्ये असलेली तिची भूमिका रहस्यमय स्वरूपाची आहे. ती सध्या आपल्या करीयरच्या शिखरावर असून आता एका बोल्ड आणि हिंसक भूमिकेत चाहत्यांसमोर येणार आहे. याविषयी अमृता सांगते, “मला करीयरच्या या वळणावर विविध प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा आहे. रूढिबध्द भूमिका न करता काहीतरी वेगळं करण्याची आणि त्यासाठी कोणत्याही माझी उतरण्याची माझी तयारी आहे. माझी ही नवी भूमिका माझी कसोटी पणाला लावणारी आहे. तसेच मला अजूनही माझ्य़ा राजीच्या भुमिकेबद्दल भरभरून प्रतिक्रिया मिळतायत. माझे चाहते,फिल्मइंडस्ट्रीतली मित्र-मंडळींकडून पाठ थोपटली जातेय, त्यामूळे आता अजून जबाबदारीने काम करायची जाणीवही मला होतेय. “

अमृताच्या नव्या वेबसीरिजविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच असली तरीही, सूत्रांच्या माहितीनुसार,अनेक खून केल्याचा आरोप असलेल्या अपराध्याच्या भूमिकेत अमृता ह्यात दिसणार असल्याचं समजतंय. या भूमिकेविषयी अमृता म्हणाली “ यामध्ये मी तुम्हांला ग्रे-शेडमध्ये दिसेन. ही एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. जिचं आयुष्य आणि त्यातले निर्णय खूप बोल्ड आहेत.

First Published on: June 5, 2018 12:52 PM
Exit mobile version