Anant Ambani Wedding : या आलिशान ठिकाणी होणार अनंत अंबानी आणि राधिकाचे लग्न

Anant Ambani Wedding : या आलिशान ठिकाणी होणार अनंत अंबानी आणि राधिकाचे लग्न

उद्योगपती मुकेश हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. सध्या मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत बराच चर्चेत असून त्याचं लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्न होणार आहे. मार्च महिन्यात गुजरातच्या जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शन पार पडलं. त्यावेळी बॉलिवूडचे कलाकारच नव्हे तर देश विदेशातील सेलिब्रिटी, गायक, राजकारणी, उद्योगपती यांनीही हजेरी लावली. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांसारखे बडे  उद्योगपती देखील अनंत राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी जामनगरमध्ये पोहोचले होते. आता हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा हा लग्न सोहळा कुठे आयोजित केला आहे हे ते जाणून घेऊया.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा लग्नसोहळा लंडनमध्ये (London) पार पडणार आहे. स्टोक पार्कमध्ये या जोडप्याचा एक कार्यक्रम पार पडणार आहे.वराची आई नीता अंबानी या लग्नाची सर्व तयारी पाहत आहेत. या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटींचंदेखील सादरीकरण होणार आहे. 300 एकरवर पसरलेले हे 529 कोटींच्या आलिशान घर बांधलं गेलंय. या घरात 49 आलिशान खोल्या तलाव, उद्यान, स्मारके, स्पा, क्लब हाऊस, रेस्टॉरंट, जिम फिटनेस सेंटर, टेनिस कोर्ट, गोल्फ कोर्स इत्यादी गोष्टी आहेत. ब्रिटनमधील सर्वात महागड्या मालमत्तापैकी ती एक आहे.

स्टोक पार्क इस्टेट हे ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ I चं घर होतं. 1908 नंतर ते कंट्री क्लबमध्ये रूपांतरित करण्यात आलं. हा ब्रिटनमधील सर्वात जुना कंट्री क्लब असून इथे जेम्स बाँडचे शूटिंग झालं होतं. तर अबू धाबी मध्ये लग्नाचा संगीत सोहळा होणार आहे.

राधिका मर्चेंटचा ब्रायडल शावर नुकताच पार पडला. राधिकाचं ब्रायडल शावर तिची खास मैत्रीण जान्हवी कपूरने होस्ट केला होता. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नसोहळ्याची तयारी सुरू आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी 19 जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा मोठ्या धूमधडाक्यात साखरपुडा झाला होता, तर 1 ते 3 मार्चदरम्यान गुजरात जामनगर येथे या कपलचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे.

हेही वाचा : ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

____________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

First Published on: April 23, 2024 5:21 PM
Exit mobile version