अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा झाला रोका; पहिला फोटो आला समोर

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा झाला रोका; पहिला फोटो आला समोर

सध्या अंबानी कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानीचा नुकताच रोका पार पडला आहे. हा कार्यक्रम राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये पार पडला असून यावेळी देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. तसेच बॉलीवूडच्या काही कलाकार देखील यावेळी उपस्थित होते. नुकताच या कार्यक्रमातील पहिला फोटो समोर आला आहे.

 

अनंत आणि राधिकाचे लवकरच होणार लग्न

येत्या काही दिवसात अनंत आणि राधिकाचे लग्न देखील पार पडणार आहे. अनंत आणि राधिका मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. काही महिन्यांपूर्वीच अंबानी कुटुंबाकडून राधिकाची‘अरंगेत्रम सेरेमनी’ देखील करण्यात आली होती.

कोण आहे राधिका मर्चंट?

राधिका ही विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. विरेन हे एका हेल्थकेअरचे सीइओ आहेत. राधिकानं पॉलिटिक्स आणि इकोनॉमिक्समध्ये ग्रँज्युएशन केले असून 2017 मध्ये तिने इसप्रावा टीममध्ये एक सेल्स एक्झुकेटिव्ह म्हणून काम केले होते. राधिका आणि अनंत हे लहानपणापासूनचे मित्र आहेत.

First Published on: December 29, 2022 3:38 PM
Exit mobile version