अनिकेत आणि स्नेहाला लग्नाआधी एकत्र पाहण्याची संधी

अनिकेत आणि स्नेहाला लग्नाआधी एकत्र पाहण्याची संधी

'हृदयात समथिंग समथिंग' चित्रपटात अनिकेत आणि स्नेहाची जोडी

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. लवकरच हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. पण लग्नाच्याआधी एकत्र बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘हृदयात समथिंग समथिंग’ या मराठी सिनेमातून हे दोघे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटातील इतर कलाकार

‘हृदयात समथिंग समथिंग’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण कारळे यांनी केले आहे. तर अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांच्या व्यतिरीक्त प्रियंका जाधव या चित्रपटात दिसणार आहेत.

हा सिनेमा माझ्यासाठी अविस्मरणीय

मी अनिकेतला हृदयात समथिंग समथिंगच्या चित्रीकरणावेळी पहिल्यांदा भेटले होते. आमच्या या सिनेमाचं आळंदी, पुणे, मुंबई आणि गोव्याला चित्रीकरण झाले आहे. गोव्यातल्या चित्रीकरणा दरम्यान आमची मैत्री झाली. हा सिनेमा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.  – स्नेहा चव्हाण, अभिनेत्री

आम्ही दोघंही खव्वय्ये

स्नेहाला भेटायच्या अगोदर मी तिचं नाटक किंवा सिनेमातलं काम पाहिलं नव्हतं. पण ती मेहनती, प्रामाणिक आणि प्रतिभावान अभिनेत्री असल्याचं तिच्यासोबत काम करताना मला जाणवलं. गोव्याच्या चित्रीकरणादरम्यान मला आयुष्यभरासाठीची मैत्रीण मिळाली. आमच्यातली एक कॉमन गोष्ट म्हणजे, आम्ही दोघंही खव्वय्ये आहोत. ही गोष्ट सोडल्यास बाकी आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. मी अंतर्मुख आहे. तर ती खूप मिळून-मिसळून राहणारी, उत्साही, मस्तीखोर, साहसी मुलगी आहे.  – अनिकेत विश्वासराव, अभिनेता

First Published on: August 9, 2018 5:08 PM
Exit mobile version