अनिल कपूरचा ‘थार’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अनिल कपूरचा ‘थार’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अनिल कपूरचा 'थार' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याचा आगामी चित्रपट ‘थार’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सने ‘थार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ६ मे रोजी नेटफ्लिक्सवर ‘थार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात हर्षवर्धन कपूर, फातिमा सना शेख, सतीश कौशिक आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात सस्पेन्स, मिस्ट्री आणि थ्रिलचा जबरदस्त मेळ आहे.

‘एके बनाम एके’ यानंतर ‘थार’ चित्रपटातून अनिल कपूर आणि हर्षची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या चित्रपटात सिद्धार्थची कहाणी आहे, जो अलीकडेच झालेल्या हिंसक हत्येनंतर खूप व्यथित झाला असतो. जेव्हा या हत्येचा तपास करण्यासाठी सुरेखा सिंह नावाची स्थानिक पोलीस येते तेव्हा चित्रपट एका वेगळ्याच वळणावर जातो. ‘थार’ अनिल कपूर फिल्म कंपनीद्वारे निर्मित आणि राज सिंह चौधरी दिग्दर्शित आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच हर्षवर्धन आणि फातिमाची जोडी दिसणार आहे.

अलीकडेच सोनम कपूरने गर्भवती असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अनिल कपूरवर लवकरच आजोबा होणार आणि हर्षवर्धन मामा होणार आहे.


हेही वाचा – अभिनेत्री आएशा टाकियाचा नवरा आणि अबू आझमींचा मुलगा फरहानसोबत गोवा विमानतळावर गैरवर्तन


 

First Published on: April 10, 2022 3:27 PM
Exit mobile version