झकास अनिल कपूर घाबरतो ‘या’ व्यक्तीला

झकास अनिल कपूर घाबरतो ‘या’ व्यक्तीला

सोनम कपूर आहुजा आणि अनिल कपूर

अनिल कपूर आणि सोनम कपूर पहिल्यांदाच मोठ्या स्क्रीनवर एकत्र काम करणार आहेत. विधु विनोद चोप्राची बहीण शेली चोप्राच्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ मधून अनिल कपूर आणि सोनम पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. तसंच बऱ्याच वर्षांनंतर जुही चावला आणि अनिल कपूरची जोडीची केमिस्ट्री लोकांना बघता येणार आहे. बाप-लेक स्क्रीन शेअर करत असल्यामुळे दोघेही कमालीचे आनंदी आहेत.

सोनम कपूरला घाबरतो अनिल कपूर
काम आणि स्पर्धा या दोन्हीमध्ये अनिल कपूर नेहमीच आक्रमक राहिला आहे. सोनम कपूरला आपल्या वडिलांशी कोणती स्पर्धा वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, तिचं उत्तर एकदम मजेशीर होतं. नुकतंच लग्न झालेल्या सोनमनं आपले वडील आपल्याला घाबरत असल्याचं सांगितलं. सोनम स्पष्टवक्ती म्हणून इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेच. पण आता अनिल कपूरदेखील तिला घाबरत असल्याचं समोर आलंय.

पहिल्यांदाच दिसणार बाप – मुलीची जोडी
‘मुबारका’मधून यापूर्वी अनिलने आपला पुतण्या अर्जुन कपूर याच्याबरोबर काम केलं होतं. आता ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ मधून सोनमबरोबर काम करणार आहे. तसेच आपला मुलगा हर्षवर्धन कपूर याच्या वडिलांच्याच भूमिकेत अभिनव बिंद्राच्या बायोपिकमधून अनिल कपूर समोर येणार आहे.

अशी असेल स्टारकास्ट
एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ मध्ये सोनम कपूरचा हिरो म्हणून राजकुमार रावची वर्णी लागली आहे. तर अनिल कपूरची आई म्हणून अभिनेत्री मधुमालती दिसेल. अनिल कपूरबरोबर बऱ्याच वर्षांनंतर जुही चावला स्क्रीन शेअर करणार आहे. विधु विनोद चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करत असून त्याची बहिण शेली चोप्रा हिचा हा पहिला दिग्दर्शनाचा प्रयत्न आहे. १२ ऑक्टोबर, २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

First Published on: June 4, 2018 4:41 AM
Exit mobile version