Video : सुशांतसाठी कॅम्पेन; अंकिता लोखंडे म्हणतेय ‘जस्टिस फॉर सुशांत’!

Video : सुशांतसाठी कॅम्पेन; अंकिता लोखंडे म्हणतेय ‘जस्टिस फॉर सुशांत’!

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी पोलीस, ईडी सुप्रीम कोर्ट सर्वत्र तपास, याचिका, खटले सुरू आहेत. अशातच राजकीय वातावरणही तापले असून महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. तर सुशांतच्या मृत्यूप्रकरणी वेगवेगळे तर्कवितर्कही लावले जात आहेत. यातच सुशांतची आधीची प्रेयसी आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने व्हिडिओ शेअर करत सुशांतसाठी न्यायाची मागणी केली आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सोशल मीडियातून सीबीआय चौकशीची मागणी सातत्याने होत आहे. हीच मागणी अंकिता लोखंडे हिनेदेखील लावून धरली आहे.

काय म्हणाली अंकिता

देशभरातून ही मागणी आहे की सुशांतला न्यान मिळायला हवा. त्याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, असे अंकिताने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तर आहात एक पोस्टर घेऊन त्यावर तिने जस्टिस फॉर सुशांत #सीबीआय फॉर एसएसआर असे लिहिले आहे.

First Published on: August 13, 2020 11:22 PM
Exit mobile version