अंकिता लोखंडेची लगीन घाई! बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत बांधणार लग्नगाठ

अंकिता लोखंडेची लगीन घाई!  बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत बांधणार लग्नगाठ

अंकिता लोखंडेची लगीन घाई! बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत बांधणार लग्नगाठ

सध्या बॉलिवूडमध्ये लगीन घाई सुरू आहे. रणबीर कपूर आलिया भट्ट, कतरीना आणि वक्की कौशल यासारखे प्रसिद्ध  कलाकार लवकरचं लग्न करणार आहेत. या जोड्यांमध्ये आणखी एका जोडीचा समावेश झालाय. ती म्हणजे पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड विक्की जैन. अंकिता आणि विक्की डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या नात्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगताना दिसते. दोघे त्यांचे फोटो पोस्ट करताना दिसतात. मात्र आता अंकिता आणि विक्की यांच्या नात्याचे लग्नात रुपांतर होणार आहे. त्यांच्या लग्नाच्या बातमीनंतर चाहते अत्यंत उत्साही असल्याचे दिसत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अंकिता लोखंडे आणि विक्की जैन लवकरच लग्न करणार असून दोघे १२, १३ आणि १४ डिसेंबर दरम्यान लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या अंकिता विक्की जैनसोबत अनेक फोटो पोस्ट करताना दिसत असते. अंकिता विक्की सोबतच्या नात्यात खूप एक्साइट आणि आनंदी असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

नुकताच अंकिताने विक्कीसोबतचा एक हॉट व्हिडिओ शेअर केलाय ज्यात तिने मरुन रंगाची सुंदर साडी नेसली आहे. साडीत अंकिता फारच सुंदर दिसतेय. तर विक्की जैन ब्लॅक फॉर्मल्समध्ये फारच हॅडसम दिसत होता. काही दिवसांपूर्वी अंकिताने विक्कीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला जो तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.

अंकिता सध्या पवित्र रिस्ता २ या मालिकेत काम करत आहे. पवित्र रिश्ता २ या मालिकेतून अंकिताने पुन्हा मालिकेच्या छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. सध्या या मलिकेला आणि अंकिताला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळत आहे.


हेही वाचा – म्हाळसा फेम सुरभी हांडे लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

First Published on: November 1, 2021 1:26 PM
Exit mobile version