जसलीन माझी गर्लफ्रेंड नाही – अनूप जलोटा

जसलीन माझी गर्लफ्रेंड नाही – अनूप जलोटा

अनूप जलोटा आणि जसलीन

बहुचर्चित मालिका बिग बॉस हा फक्त ड्रामा आणि कॉन्ट्रोव्हर्सीने चालत असल्याचे नेहेमीच सांगण्यात येते. हा शो स्क्रीटेड असल्याचाही आरोप काही कलाकारांनी केला. मात्र आता बिग बॉस आपला TRP वाढवण्यासाठी प्रयत्न करतोयं. बिग बॉसचा १२ वा सीजन भजन सम्राट अनूप जलोटा आणि त्यांच्याहून वयाने लहान असलेली मॉडेल अधिक गायीका जसलीन मथारूमुळे चर्चेत आला होता. जलोटा आणि जसलीन यांच्यात वयाचा फरक मोठा आहे अशामध्ये यांच्यात प्रेमसंबध असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मागील ३ वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबध असल्याचे जलोटा यांनी सांगितले होते. त्यामुळे कार्यक्रमात ही जोडी लोकांच्या नरजेत आली. मात्र या आठवड्यात अनूप जलोटा घरा बाहेर आलेत. यानंतर जसलीनशी त्यांचे प्रेमसंबध नसल्याचे त्यांनी सांगितले. जसलीन फक्त आपली शिष्य आहे आणि तिला मदत करण्यासाठी त्यांनी प्रेमसंबध असल्याची कबूली दिली असल्याचे कबूल केलं आहे.

काय म्हणालेत भजन सम्राट

“लोकांना आमचं नात समजलेलं नाही. आमच्यात प्रेमसंबध नसून गायनासंबधीचे नाते आहे. ती माझी विद्यार्थीनी आहे आणि मी तिचा शिक्षक आहे. संगीत शिकण्यासाठी मी तिला मदत करत आहे. आमच्यात गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असे नाते नाही. जसलीन आणि तिच्या कुटुंबीयांना मी मागील अनेक काळापासून ओळखतो. जसलीन आणि माझी जास्तवेळा भेट झाली नाही. एक दिवशी जसलीनने मला सांगितले की तिला बिग बॉसमधून फोन आला आहे. मात्र एक विचित्र जोडी म्हणूनच तिला इंट्री दिला जाईल असे तिने सांगितले. मात्र माझे भजनाचे कार्यक्रम असल्याने मी जाऊ शकत नव्हतो. यानंतर तिचे वडिल मला भेटले त्यांनी जसलीनसोबत जाण्यासाठी माझी विनवणी केली. तिचे नाव प्रसिद्ध करण्यासाठी मी बिग बॉसच्या घरात होतो. आम्ही जेवढापण वेळ घरात होतो तेव्हा शो ला TRP चांगला मिळाला.”- अनूप जलोटा

First Published on: October 29, 2018 3:23 PM
Exit mobile version