ही अनुष्का शर्माची जुळी बहिण तर नाही?

ही अनुष्का शर्माची जुळी बहिण तर नाही?

सौजन्य - सोशल मीडिया

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं समजतंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्का नेहमीच तिच्या चाहत्यांना भेटायला येत असते. एखाद्या सेटवरचे किंवा हबी विराट कोहली सोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत, अनुष्का तिच्या व्यावसायीक आणि खासगी आयुष्याची माहिती फॅन्सपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे काही ना काही कारणामुळे अनुष्का कायमच चर्चेत असते. मात्र, आता एका वेगळ्या कारणामुळे अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनुष्काची ‘बिछडी जुडवा बहन’ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेटवर व्हायरल होणारी ही सुंदरी हुबेहुब अनुष्कासारखी दिसत असल्यामुळे, ती अनुष्काची अमेरिकेतील जुळी बहिण असल्याच्या कमेंट्स सोशल मीडियावर उमटत आहेत.

 

कोण आहे ही सुंदरी? 

हा फोटो आहे अमेरिकेतील गायिका ज्युलिया मायकेलचा. ज्युलिया मायकेल ही अमेरिकेतील प्रसिद्ध सिंगर आहे. ज्युलिया मायकेल आणि अनुष्का शर्मा च्या चेहऱ्यामध्ये इतकं साधर्म्य आहे की, पाहणाऱ्याला या दोघी जुळ्या बहिणी असल्याचा भास होतो. काही नेटिझन्सनी ज्युलियाला ‘भारतात तुझी कोणी बहिण आहे का?’ असा थेट प्रश्न इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विचारला आहे. तर काहींनी अभिनेत्री अनुष्का शर्माला टॅग करत ‘अमेरिकेत तुझी जुळी बहिण मिळाली’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही उत्साही नेटिझन्सनी तर ‘विराट कोहलीची अमेरिकन मेव्हणी मिळाली’ अशा अर्थाचे काही गमतीशीर मिम्सही व्हायरल केले आहेत.

First Published on: February 5, 2019 3:30 PM
Exit mobile version