Arjun Bijlani: बॉलिवूडमधील स्टार सिस्टिम बंद करा – अर्जुन बिजलानी

Arjun Bijlani: बॉलिवूडमधील स्टार सिस्टिम बंद करा – अर्जुन बिजलानी

Arjun Bijlani: बॉलिवूडमधील स्टार सिस्टिम बंद होणे गरजेचे - अर्जुन बिजलानी Arjun Bijlani: बॉलिवूडमधील स्टार सिस्टिम बंद होणे गरजेचे - अर्जुन बिजलानी

बॉलिवूड तसेच रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन बिजलानीने बॉलिवूड संदर्भात एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. बॉलिवूडमधील स्टार सिस्टिम ही कास्ट सिस्टिमसारखी आहे. त्यामुळे बॉलिवूडची ही स्टार सिस्टिम बंद होणे गरजेचे असल्याचे अर्जुन बिजलानी यांने म्हटले आहे. अर्जुन हा बॉलिवूडमधील जातिव्यस्थेच्या विरोधात आहे. अर्जुने म्हटले आहे की, बॉलिवूड माध्यमात किंवा इतर कोणत्याही माध्यमातील लोकांना समान मान मिळावा त्यांच्यात कोणताही भेदभाव नसावा. बॉलिवूडमध्ये स्टार सिस्टिम ही कास्ट सिस्टिम सारखी आहे. ज्यात बदल व्हावा अशी माझी इच्छा आहे.

अर्जुनने पुढे असे म्हटले की, अभिनय हा भाषा आणि माध्यम याच्या भेदाच्या पलिकडे आहे. कलाकाराकडे एक कलाकार म्हणून पहावे. त्याच्या जातीवरुन त्यांच्याकडे पाहणे बंद झाले पाहिजे. त्याचप्रमाणे कलाकाराची निवड ही युनिर्व्हसल असली पाहिजे. एक टिव्ही कलाकार कोणत्याही ठिकाणी काम करू शकतो. तो कुठून आला आहे त्याची जात काय याचा कोणताही संबंध नसला पाहिजे.कोण काय करू शकतो त्याची फ्लेक्झिबिलीटी किती असावी हे त्याच्या भाषेवर मर्यादित नसावे.

अनेक निर्मात्यांना हे माहिती आहे की संपूर्ण इंडस्ट्रीत समानता असणे गरजेचे आहे. लोकांना वेगवेगळे कलाकार वेगवेगळे प्रयोग पहायचे असतात. मात्र तरिही अनेक लोक एकाच टाइपचा कंटेट करताना दिसतात. कलाकारांप्रमाणे प्रेक्षकही प्रयोग करत आहेत. त्यामुळे कंटेट तयार करताना त्यांचाही विचार करणे गरजेचे आहे.

अर्जुन बिजलानी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक बॉलिवूडमध्ये काम करत आहे. मिले जब हम तुम, कवच… काली शक्तीयो से, इश्क मे मरजावा,नागिन आणि स्टेट ऑफ सीज: २६/११’ मध्ये त्याने काम केले आहे


हेही वाचा – अनुराग कश्यपच्या नव्या सिनेमात कृति सेनन दिसणार मुख्य भूमिकेत

First Published on: December 15, 2021 8:11 PM
Exit mobile version