करिना कपूर आणि अर्जुन कपूर पुन्हा येणार एकत्र

करिना कपूर आणि अर्जुन कपूर पुन्हा येणार एकत्र

अर्जुन कपूर आणि करिना कपूर

अनुराग बासू आपल्या ‘लाईफ इन अ मेट्रो’चा सिक्वल घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात चार वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिक्वलमध्ये पुन्हा एकदा आता करिना कपूर आणि अर्जुन कपूरला कास्ट करण्यात येणार असल्याची बातमी आहे. यापूर्वी ही जोडी ‘की आणि का’ चित्रपटामध्ये एकत्र दिसली होती. या चित्रपटालादेखील यश मिळालं होतं.

कथा वेगळी

‘लाईफ इन अ मेट्रो’ हा चित्रपट २००७ मध्ये आला होता. यामध्ये चार वेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान सिक्वलमध्येही अशाच प्रकारच्या वेगळ्या कथा असण्याची शक्यता आहे असं इंग्रजी वृत्तपत्र ‘डीएनए’नं सांगितलं आहे. मात्र याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती नाही. करिना कपूर आणि अर्जुन कपूरची कथा वेगळीदेखील असण्याची शक्यत आहे. अनुराग बानू स्वतः या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर या चित्रपटालादेखील प्रीतमच संगीत देणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला चित्रपट समीक्षकांचीदेखील पसंती मिळाली होती.

करिना आणि अर्जुनही सध्या व्यग्र

करिना या चित्रपटाशिवाय आता करण जोहरच्या एका चित्रपटात अक्षयकुमारबरोबर दिसणार आहे. तर नुकतंच करण जोहरनं आपल्या ‘तख्त’ या चित्रपटात रणवीर सिंह, भूमी पेडणेकरबरोबर करिना कपूर आणि आलिया भट अशी मोठ्या स्टारकास्टची घोषणा केली आहे. तर अर्जुन कपूर सध्या ‘पानिपत’, ‘नमस्ते इंग्लंड’ आणि ‘संदीप और पिंकी फरार’मध्ये दिसणार आहे.

First Published on: August 10, 2018 3:06 PM
Exit mobile version