मलायका – अर्जुन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार

मलायका – अर्जुन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार

मलाइका आणि अर्जुन कपूर एकत्र

बॉलीवूडमधील सर्वाधीक चर्चीली जाणारी जोडी म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर. त्यांच्यातील नात्यांसंबंधी नेहमीच बोलले जाते. आता हे लव बर्ड लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगू लागली आहे. आगामी वर्षात दोघं लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या मलायका अरोरा छोट्या पडद्यावरील इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये परिक्षकेच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच या शोमध्ये अर्जुन कपूरने पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी मलायकाने तिचा ४५ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अर्जुनही उपस्थित होता. दोघेही मिलानवरून एकत्र मुंबईला परतले. मलायका आणि अर्जुनला मिलान विमानतळावर हातात हात घेतलेले पाहण्यात आले होते.

लवकरच देणार प्रेमाची कबूली 

आजवर या कपलने त्यांच नात जगापासून लपवून ठेवलं होत. मात्र लवकरचे त्यांच्या रिलेशनशीपची जाहीर घोषणा करणार आहेत. दोघांमधील प्रेमप्रकरण बऱ्याच वर्षांपासूनच चर्चेत राहील आहे. मात्र आपण फक्त चांगले मित्र असल्याचे मलायका सांगत आली आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांना अबु जानी आणि संदीप खोसला यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी पाहिले होते. त्यानंतर एक रिअॅलिटी शोमध्येही अर्जुनच्या डांस करण्यामुळे दोघांमधील नात्यांवर चर्चा रंगली होती.

नात्याबाबत गांभिर्य जपले 

फिल्मफेअरने दिलेल्या माहितीनुसार दोघ एकमेकांना खुपच पसंत करतात. दोघांनी कधीही आपल्या नात्याची वाच्यता जाहीरपणे केली नाही. ते एकमेकांना पुरेशी मोकळीक देतात. मलायका आणि अर्जुन त्यांच्या नात्याबाबत गंभीर असून पुढील वर्षापर्यंत लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतात. यापूर्वी मलायकाचे अभिनेता अरबाज खानसोबत लग्न झाले होते. त्यांनी बराच काळ एकत्र घालवला आहे. मात्र घटस्फोटानंतर दोघेही स्वतंत्र झाले आहेत.

First Published on: October 27, 2018 12:45 PM
Exit mobile version