‘पठाण’ वादावर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया म्हणाला… कलाकार म्हणून आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात

‘पठाण’ वादावर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया म्हणाला… कलाकार म्हणून आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 10 जानेवारी रोजी या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडत आहेत. दरम्यान, अशातच आता या प्रकराणावर अभिनेता अर्जुन कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला अर्जुन कपूर?
एका मुलाखतीत शाहरुख खान आणि दीपिकाच्या चित्रपटाची बाजू घेत अर्जुन म्हणाला की, “मला वाटतं की आपल्याला आपल्या सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकारवर विश्वास ठेवायला हवा. जे एकत्र काम करतात. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की, लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांनाच आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. परंतु एक कलाकार म्हणून आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात, जी चित्रपटाची गरज असते.”

पुढे अर्जुन म्हणाला की, “आमचं काम फक्त चित्रपटाची गरज पूर्ण करणं इतकचं आहे आणि त्यानंतर चित्रपट प्रेक्षकांना समर्पित असतो. तेच निर्णय घेतात की हा चित्रपटामुळे त्यांच्या भावना दुखावल्या की नाही. जेव्हा कोणताही चित्रपट तयार होतो, तेव्हा पूर्ण प्रोसेस फॉलो केली जाते. या प्रोसेसमध्ये लोकशाहीच्या नियमांना देखील फॉलो करायला हवं.”

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.


हेही वाचा :

चित्रा ताई ग्रेट है…; स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत उर्फीचा टोला

First Published on: January 10, 2023 10:42 AM
Exit mobile version