अभिनेता अर्जुन कपूरला बनायचे आहे बाप!

अभिनेता अर्जुन कपूरला बनायचे आहे बाप!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने २०१२ मध्ये इश्कजादे या चित्रपटासह यशस्वी पदार्पण केले होते. यानंतर अर्जुनने कॉमेडी, ड्रामा आणि अॅक्शनपटासारख्ये अनेक चित्रपट केले होते. बॉलिवूड विश्वात सात वर्ष काम केल्यानंतर आता अर्जुनला एक विशेष भूमिका साकारायची इच्छा आहे आणि ती विशेष भूमिका असणार आहे वडिलांची. अर्जुन कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत असे सांगितले की, ” कोणताही वेळ न दवडता लगेच चित्रपटात काम करायचे आहे. गुंड, गॅगस्टर आणि वडिलांच्या भूमिकेत दिसण्याची ईच्छा आहे. ”

पण संधी मिळाली नाही

भविष्यात नेमके काय करायचे असे अर्जुन विचारले असता, त्याने असे सांगितले की,”असे ठराविक सांगणे कठीण आहे. तसे पाहता मला खूप काही करण्याची ईच्छा आहे. मला गुंड, गॅगस्टरची भूमिका असणारा चित्रपट करायचा आहे. परंतु, तशी संधी मला मिळाली नाही. तशी संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

गॅग्स्टर, वडिलांच्या भूमिकेसोबतच माझ्या वयाची प्रेमकथा करण्यास आवडेल पण, माझे वय ३३ वर्ष असल्याने अशा भूमिका साकारण्याची संधी मिळत नाही. ” अर्जुन कपुरने या काही दिवसात पानिपत या चित्रपटाची तयारी करत आहे. तसेच नुकतेच ‘इंडियाज मोस्ट वांटेड’ या चित्रपटाची शुटिंग पुर्ण केली आहे.

First Published on: April 2, 2019 8:23 PM
Exit mobile version