‘झी मराठी’च्या कलाकारांनी ठाण्यात साजरा केला ‘राष्ट्रीय मतदार दिवस’

‘झी मराठी’च्या कलाकारांनी ठाण्यात साजरा केला ‘राष्ट्रीय मतदार दिवस’

'झी मराठी'च्या कलाकारांनी ठाण्यात साजरी केला 'राष्ट्रीय मतदार दिवस'

आज राष्ट्रीय मतदार दिवस आहे. या दिनानिमित्ताने ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे नववा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’साजरा करण्यात आला. देशासाठी मतदानाचा हक्क हा अमुल्य असा हक्क आहे. लोकशाही व्यवस्थेत मतदार हा महत्त्वाचा घटक असतो. या मतदानाचे महत्त्व तरुण मतदारांना व्हावा, या हेतून ठाण्याचे गडकरी रंगायतन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात झी मराठीच्या कलाकरांनी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला आहे. अभिनेत्री अनिता दाते, अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि संदीप कुलकर्णी, तेजेंद्र नेसवणवर हे कलाकार या कार्यक्रमात उपस्थित होते. अभिनेत्री अनिता दाते, अभिजीत खांडकेकर, इशा केसकर हे कलाकार ‘झी मराठी वाहिनी’च्या ‘माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेतील कलाकार आहेत. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नारवेकर देखील उपस्थित होते.

का केला जातो मतदार दिवस साजरा?

भारतात मतदानाच्या टक्‍केवारीचे घटते प्रमाण लक्ष्यात घेऊन २०११ पासून २५ जानेवारीला राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. तत्‍कालिन राष्‍ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या ६१ व्या स्‍थापनादिनी हा दिवस साजरा करण्याचा शुभारंभ केला. आज नववा राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २५ जानेवारी १९५० रोजी एका स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेचे नाव निवडणूक आयोग असे आहे. देशात निपक्ष आणि पारदर्शी निवडणुका घेणे हे निवडणुक आयोगाचे कार्य आहे.

First Published on: January 25, 2019 2:33 PM
Exit mobile version