हृतिकच्या गाण्यावर आशाजींनी धरला ताल, डान्स व्हिडिओ होतेय व्हायरल

हृतिकच्या गाण्यावर आशाजींनी धरला ताल, डान्स व्हिडिओ होतेय व्हायरल

आशा भोसले

एक बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत. आशा भोसले यांना त्यांच्या संगीताचा वारसा मुळातच त्यांच्या घरातून मिळाला आहे. आपल्या जादुई स्वरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशादीदींना गायनासह असलेली अभिनय आणि नृत्याची आवड सर्वांना परिचित आहे. खणखणीत आणि दमदार आवाजाचासोबत उत्तम नृत्याची कलाही त्यांच्यात आहे. नुकतच त्यांचा एक डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. वयाच्या ८८ व्या वर्षीही त्यांनी केलेला हा डान्स पाहून सर्व रसिकप्रेक्षक त्यांच्यावर फिदा झाले आहेत. या व्हिडिओमधझ्ये आशा दीदी हृतिक रोशनच्या ‘एक पल का जीना’ या गाण्यावर धमाल डान्स करताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हृतिक रोशनच्या अनेक सिग्नेचर स्टेप्सही त्यांनी केल्या आहेत. हा व्हिडिओ जुना असला तरी आशा दीदींच्या जबरदस्त नृत्यामुळे सर्वांन हैराण झाले आहेत.


हे वाचा- भाईजानच्या ‘राधे’च्या ट्रेलरचा धुमाकुळ, चित्रपट प्रदर्शित करण्याचा नवा मार्ग पाहा

First Published on: April 22, 2021 3:24 PM
Exit mobile version