‘होम मिनीस्टर बघू नकोस’ अतुल परचुरेंनी मुलीला दिला सल्ला!

‘होम मिनीस्टर बघू नकोस’ अतुल परचुरेंनी मुलीला दिला सल्ला!

झी मराठी प्रेक्षकांसाठी एक असा चॅट शो सादर करणार आहे ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सज्ज होतील. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘अळीमिळी गुपचिळी’. लहानांची मोठ्यांना कोपरखळी असलेला हा धमाल शो ‘अळीमिळी गुपचिळी’ १७ जानेवारी पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत अभिनेता अतुल परचुरे.

या कार्यक्रमा विषयी बोलताना अतुल परचुरे म्हणाले, अळीमिळी गुपचिळी हा एक मजेदार कार्यक्रम आहे. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचा सार्थ अभिमान असतोच पण कुठल्या क्षणी त्याच्या भोळेपणाने आपली विकेट घेईल हे हि सांगता येत नाही. मुलं जे मनात येईल ते बोलतात, आत एक बाहेर एक असं काही नसतं त्यामुळे बाहेरच्या लोकांसमोर किंवा पाहुण्यांसमोर ते कधी काय बोलून जातील याचा नेम नसतो. सिलेब्रिटीज हे जगासाठी जरी सिलेब्रिटी असले तरी त्यांच्या मुलांसाठी ते आई-वडीलच असतात. त्यामुळे ते त्यांची कशी विकेट घेतील हे या कार्यक्रमात पाहायला मिळेल.

माझ्या मुलीने देखील माझी असीच विकेट काढली होती. होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी माझी मुलगी आदेश बांदेकर यांना म्हणाली कि माझे बाबा मला सांगतात होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम बघत जाऊ नकोस. अस सांगत मला तोंडावर पाडलं होतं. अशी गंमत तुम्हाला हा कार्यक्रम बघताना येईल.

First Published on: January 15, 2020 10:15 AM
Exit mobile version