‘विराट सेने’चा पराभव पाहून फॅनने सोनू सूदकडे मागितली मदत, म्हणाला

‘विराट सेने’चा पराभव पाहून फॅनने सोनू सूदकडे मागितली मदत, म्हणाला

कोरोना दरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूद प्रत्येक गरजूंना मदत करण्यास पुढे सरसावला होता. सोनू सूदचा हाच अंदाज पाहून चाहत्यांनी देखील त्यांच्याकडे काही मागण्या पुर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कधीकधी चाहते सोनू सूदकडून अशी मदत मागतात की त्यांना पूर्ण करणे कठीण तर होते. मात्र त्या मागण्यांना उत्तर देणं देखील कठीण होते. नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर चाहते नाराज झाले आहेत आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अशा स्थितीत एका चाहत्याने ऑस्ट्रेलियामध्ये अडकलेल्या टीम इंडियाला मदत करण्यासाठी सोनू सूदची मदत घेतली. तर यासंदर्भात सोनू सूद यांनी अतिशय मजेदार उत्तर दिले.

यावेळी एका चाहत्याने सोशल मीडियावर सोनू सूदला विचारले, ‘प्रिय सोनू सूद, भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियामध्ये अडकले आहेत. त्यांना तुम्ही आणू शकतात का?’ असा अनोखा प्रश्न चाहत्याने विचारल्यानंतरही सोनू सूदने आपल्या चाहत्याला निराश न करता त्याला लगेच उत्तर दिले. ‘भारतीय संघाला अजून एक संधी द्या, पुढच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघालाही भारतात आणू…’ दरम्यान, सोनू सूदने लॉकडाऊनदरम्यान देशातील वेगवेगळ्या भागातून मुंबईत आलेल्या आणि इथे अडकून पडलेल्या प्रवासी मजूरांचे स्थलांतर करण्यास मदत केली होती.

‘विराट सेने’चा पराभव पाहून कोहली निःशब्द

पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला अ‍ॅडलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. भारताला पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळाली होती. परंतु, तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपुष्टात आला. धावसंख्येच्या बाबतीत भारताचा हा कसोटीत निच्चांक ठरला. ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात ९० धावांचे लक्ष्य ८ विकेट राखून पूर्ण करत सामना जिंकला. त्यामुळे सामन्यानंतर काय बोलावे हे भारताचा कर्णधार विराट कोहलीला सुचत नव्हते.

चाहत्यांनी सोनूचे मंदिर बनवून मानले आभार

तेलंगणातील सिद्दीपेट जिल्हातील डब्बा टांडागावातील लोकांनी सोनू सूदला समर्पित मंदिर बांधले आहे. या मंदिराचे रविवारी ग्रामस्थांनी उद्घाटन केले. यावेळी सोनू सूदची आरती करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून गाणे देखील गायले.


IND vs AUS : काय बोलावे सुचत नाही – विराट कोहली 

First Published on: December 21, 2020 12:34 PM
Exit mobile version