‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’, ‘RRR’ चित्रपटांना टाकलं मागे

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’, ‘RRR’ चित्रपटांना टाकलं मागे

हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’येत्या 16 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमरुनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. दरम्यान, 15 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करायला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 14 दिवसातच 300 कोटींचा आकडा पार केला आहे.‘अवतार : द वे ऑफ वॉटर’च्या या कमाईने आलिया आणि रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला मागे टाकलं असून लवकरच हा केजीएफ 2 आणि आरआरआर ला देखील मागे टाकू शकतो.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने जगभरातून कमावले इतके कोटी
जेम्स कॅमरुनच्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 41 कोटी तर दुसऱ्या दिवशी 42 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 46 कोटी कमावले असून चौथ्या दिवशी 14-16 कोटी आणि पाचव्या दिवशी 18 कोटी कमावले. तर सहाव्या दिवशी 15.75 कोटी आणि सातव्या दिवशी 13.50 कोटी कमावले आहेत. आठव्या दिवशी 12.85 कोटी तर नवव्या दिवशी देखील बऱ्यापैकी कमाई केली तर दहाव्या दिवशी 24.50 कोटी तर अकाराव्या दिवशी 12 कोटी, बाराव्या दिवशी 10.25 कोटी आणि तेराव्या दिवशी 9.60 कोटी, चौदाव्या दिवशी 9.50 कोटी कमावले होते. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तसेच संपूर्ण जगभरातून या चित्रपटाने 8200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

2009 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘अवतार’

दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’ हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास 13 वर्षांनी ‘अवतार’ चा दुसरा सिक्वेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 2009 साली या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला चांगली भुरळ पाडली होती. एका सामान्य कथेच्या आधारावर फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेऊन ‘अवतार’ चित्रपटाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल बनवण्याची घोषणा याआधीच केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.

 


हेही वाचा :

नागराज मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिर्याणी’ लवकरच येणार भेटीला

First Published on: December 30, 2022 11:31 AM
Exit mobile version