तुम्ही ‘अंधाधून’चा हा ट्रेलर पाहिलात का?

तुम्ही ‘अंधाधून’चा हा ट्रेलर पाहिलात का?

अंधाधून

अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर ‘अंधाधून’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच आयुषमान खुराना, राधिका आपटे आणि तब्बू अशी तगडी स्टार कास्ट एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट मर्डर मिस्ट्रिवर आधारीत आहे. ‘अंधाधून’ या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर आयुषमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये आयुष्यमान हा अंधळ्या माणसाची भूमिका करत असल्याचं बघायला मिळत आहे. सगळं सुरळीत चालू असताना एका व्यक्तीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे चित्रपटाला वेगळं वळण आल्याचं ट्रेलरवरून लक्षात येतंय. येत्या ५ ऑक्टोबरला ‘अंधाधून’ प्रदर्शित होणार आहे.

आयुषमान पहिल्यांदाच एका अंध म्युझिशियनच्या भूमिकेमध्ये आहे. तो आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत असताना आयुषमानची ओळख राधिका आपटेशी होते. त्यांची मैत्री फुलत असतानाच अचानक त्यांच्या मैत्रीत तब्बूची एण्ट्री होते. आयुषमान तब्बूच्या घरी तिला पियानो शिकवायला जात असतो, आणि याचदरम्यान तिच्या घरी एका व्यक्तीचा खून होतो. आणि पुढे चित्रपटात खून नेमका कोणी केला? याचा शोध सुरू होतो. मात्र अनेकवेळा आंधळ्या आयुषमानवर खून केल्याचा आरोप होतो. त्याचप्रमाणे एक वेगळी उत्सुकता चित्रपटात निर्माण होते. त्यात आयुषमानच्या ट्रेलरमधील शेवटच्या वाक्यामुळे तर तोच खूनी आहे की काय? असं काही क्षण आपल्यालाही वाटतं. मात्र आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला ५ ऑक्टोबरला मिळणार आहेत!

First Published on: September 2, 2018 6:53 PM
Exit mobile version