Balasaheb Thackeray Birth Anniversary: ‘या’ चित्रपटांतून दिसली बाळासाहेबांची व्यक्तिरेखा आणि आवाज

Balasaheb Thackeray Birth Anniversary: ‘या’ चित्रपटांतून दिसली बाळासाहेबांची व्यक्तिरेखा आणि आवाज

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे यानिमित्ताने राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1962 रोजी पुण्यात झाला. बाळासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाखो शिवसैनिकांसाठी प्रेरणास्थान आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी राज्य सरकारकडून 23 जानेवारी हा दिवस बाळ ठाकरे जयंती म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून 23 जानेवारीला बाळ ठाकरे जयंती साजरी केली जाते. मराठी चित्रपटसृष्टीत बाळासाहेबांवर आधारित काही चित्रपट तयार करण्यात आले आहेत ज्यातून त्यांची व्यक्तिरेखा सर्वांना पाहायला मिळाली.

‘या’ चित्रपटांतून दिसली बाळासाहेबांची व्यक्तिरेखा

बाळकडू

2015 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘बाळकडू’ हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल काळे यांनी केले होते, तर निर्मिती स्वप्ना पाटकर यांनी केली होती. अभिनेता उमेश कामत चित्रपटात मुख्य भूमिकेत होता.

ठाकरे

2019 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ठाकरे’ चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित होता. अभिजीत पानसे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून चित्रपटाची पटकथा संजय राऊत यांची आहे. अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी बाळ ठाकरे यांची भूमिका साकारली होती तर अभिनेत्री अमृता रावने मीना ठाकरे यांची भूमिका साकारली होती.

धर्मवीर

‘धर्मवीर’ चित्रपट शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारीत आहे. या चित्रपटामध्ये देखील बाळासाहेबांची व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे. 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

 

First Published on: January 23, 2023 8:10 AM
Exit mobile version