आर्थिक अडचणीमुळे ‘या’ प्रसिद्ध मालिकेचा दिग्दर्शक विकतोय भाजी-पाला!

आर्थिक अडचणीमुळे ‘या’ प्रसिद्ध मालिकेचा दिग्दर्शक विकतोय भाजी-पाला!

देशात असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर आर्थ व्यवस्थेवर देखील याचा परिणाम झाला आहे. याचा परिणाम टीव्ही इंडस्ट्रीवरही झाला आहे. बालिका वधू आणि कुछ तो लोग कहेंगे या सारख्या प्रसिद्ध टीव्ही सीरियलचे दिग्दर्शक रामवृक्ष गौड हे कुटूंबाला पोसण्यासाठी भाजीपाला विकून आपले सध्याचे आयुष्य जगत आहेत.

आजमगढ़ जिल्ह्यातील निजामाबाद शहरातील फरहाबाद येथे राहणारे रामवृक्ष २००२ मध्ये त्याचा मित्र लेखक, साहित्यकार शाहनवाज खान याच्या मदतीने मुंबईला आले होते. चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. प्रथम लाईट्स विभागात काम केले, त्यानंतर टीव्ही प्रॉडक्शनमध्ये देखील त्यांनी काम केले. हळूहळू अनुभव वाढला, त्यानंतर दिग्दर्शनाच्या दिशेने एक संधी आली. दिग्दर्शनाचे काम रामवृक्ष यांना आवडले आणि त्यांनी या क्षेत्रात आपले करियर करण्याचे ठरविले.

या मालिकेतही होता सहभाग

आधी बर्‍याच सीरियलच्या निर्मितीत त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले, त्यानंतर एपिसोड डायरेक्टर, युनिट डायरेक्टर म्हणून काम केले, त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. रामवृक्ष यांनी असे सांगितले की, त्यांनी बालिका वधूमध्ये युनिट डायरेक्टर म्हणून काम केले, त्यानंतर इस प्यार को क्या नाम दूं, कुछ तो लोग कहेंगे, हमार सौतन हमार सहेली, झटपट चटपट, सलाम जिंदगी, हमारी देवरानी, थोड़ी खुशी थोड़ा गम, पूरब पश्चिम, जूनियर जी सारख्या मालिकांमध्ये काम करण्याची संधीही त्यांना मिळाली.

कोरोनामुळे आली अशी वेळ…

रामवृक्ष यांनी यशपाल शर्मा, मिलिंद गुणाजी, राजपाल यादव, रणदीप हूडा, सुनील शेट्टी यांच्या दिग्दर्शकांसह सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. येत्या काही काळात भोजपुरी आणि हिंदी चित्रपटाचे काम रामवृक्ष यांच्याकडे आहे, त्यांनी असेही सांगितले की, आता त्याकडे लक्ष लागले आहे पण कोरोना संसर्गामुळे सर्वच बंद असल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. रामवृक्ष म्हणतात की त्यांचे मुंबईत त्यांचे स्वतःचे घर आहे, परंतु दोन वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब आजारपणामुळे येथे आले होते.

काही दिवसांपूर्वी ते एका चित्रपटाच्या रेकीसाठी आजमगडला आले होते. ते काम करत असताना, कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन झाला. यानंतर त्यांना मुंबईत परत येणे शक्य नव्हते. काम थांबल्यावर आर्थिक संकट सुरू झाले. निर्मात्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, प्रकल्पाचे काम एक ते दीड वर्षानंतरच सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि आजमगड शहरातील हरबंशपूर येथील डीएम निवासस्थानाजवळ रस्त्याच्या कडेला एका हातगाडीवर भाजीपाला विक्री सुरू केली. त्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिकरित्या योग्य पद्धतीने जीवन जगत आहे. अगदी बालपणातच, ते भाजीच्या व्यवसायात वडिलांना मदत करायचे, म्हणून हे काम त्यांना अधिक चांगले वाटत असून या कामातून मिळणारी कमाई सध्या त्यांनी समाधानकारक वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.


Lata Mangeshkar’s Birthday: लता दीदींची TOP 10 ‘सदाबहार’ गाणी

First Published on: September 28, 2020 12:41 PM
Exit mobile version