Bappi Lahiri Love Gold : बप्पी दांची पहिली चैन ते गोल्ड मॅन अशी आतापर्यंतची कहाणी

Bappi Lahiri Love Gold : बप्पी दांची पहिली चैन ते गोल्ड मॅन अशी आतापर्यंतची कहाणी

Bappi Lahiri Love Gold : बप्पी दांची पहिली चैन ते गोल्ड मॅन अशी आतापर्यंतची कहाणी

८० चा काळ गाजवणारे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचे आज निधन झाले. लोक प्रेमाने त्यांना बप्पी दा असे म्हणायचे. हिंदीतील टॉप कंम्पोजरमधील एक बप्पी दा होते. आतापर्यंत त्यांनी ९ हजारांहुन अधिक गाण्यांना म्युझिक दिले आहे. बप्पी दांचे त्यांच्या गाण्यावर जितके प्रेम होते तितकेच प्रेम त्यांना सोन्याच्या दागिन्यांवर होते. बप्पी लहरींना गोल्ड मॅन किंवा गोल्ड किंग म्हणून ओळखायचे. त्यांच्या या सोन्याच्या वेडाची कहाणी फार कमी जणांना माहिती असेल. जाणून घ्या बप्पी दांच्या पहिल्या सोन्याच्या चैनीपासून गोल्ड टी सेट पर्यंतची मजेदार कहाणी.

बप्पी दांना सोन्याच्या दागिन्यांविषयी अनोखा जिव्हाळा होता. २०१९मध्ये त्यांनी अनुप्पा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, १९७४मध्ये माझ्या आईने मला पहिली सोन्याची चैन घेतली. त्यानंतर दुसरी चैन १९७७मध्ये त्यांच्या पत्नीने दिली होती. त्यानंतर माझ्या आयुष्यात सोने खरेदी करण्याचा सिलसीला कायम सुरु राहिला. प्रत्येक प्रोजेक्टनंतर ते सोन्याची एक वस्तू खरेदी करायचे.

बप्पी दांनी पुढे म्हटले, माझ्या सोन्याने नवीन स्थान निर्माण केले. सोने माझी ओळख बनली. सोन म्हणजे बप्पी लहरी आणि बप्पी लहरी म्हणजे सोने असे समीकरण तयार झाले. त्यांनी यावेळी एक किस्सा सांगितला, ते म्हणाले, मी एका रेकॉर्डिंगसाठी न्यूयॉर्क कि इंग्लंडला गेलो होते. तिथे प्रचंड थंडी असल्याने मी माझ्या सगळे सोन्याचे दागिने काढून जॅकेटमध्ये ठेवले. तिथे काही भारतीय लोक मला भेटले आणि त्यांनी मला विचारले तुम्ही बप्पी लहरी ना ? मी हो म्हटले, तुम्ही बप्पी लहरी आहात मग तुमचे दागिने कुठे आहेत असे त्यांनी विचारले. तेव्हा माझ्या लक्षात आले सोने आता माझी नवी ओळख झाली आहे.

बप्पी दा दरवर्षी दिवळीत एक सोन्याची चैन खरेदी करतात मात्र मागच्या वर्षी २०२१मध्ये त्यांनी धनतेरेसला सोन्याची चैन खरेदी न करता एक गोल्ड टी सेट म्हणजेच चहा पिण्याचे कप सोन्याचे कप खरेदी केले. हा टी सेट फार अनोखा आणि किंमती होता. हा सेट खरेदी करण्यामागचे कारण देखील बप्पी दांनी सांगितले. ते म्हणाले, माझ्याकडे आत सगळं काही आहे. त्यामुळे मी यंदा सोन्याची चैन खरेदी करणार नाही. यावेळी माझ्या पत्नीसाठी मी गोल्ड टी सेट गिफ्ट करायचा आहे.

 


हेही वाचा - Bappi Lahiri Top 10 Songs : डिस्को डान्सर ते ओ ला ला,...

First Published on: February 16, 2022 10:49 AM
Exit mobile version