‘पॉलीअमॉरी’ संकल्पनेवरील ‘सोप्पं नसतं काही’ वेबसीरिज ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस

‘पॉलीअमॉरी’ संकल्पनेवरील ‘सोप्पं नसतं काही’ वेबसीरिज ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस

काळ बदलतो तसे समाजाचे आचारविचार बदलतात. जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीसोबत सामाजिक नियमात बदल होत जातात. काही वर्षांपूर्वी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही नवीन संकल्पना समोर आली होती. परदेशात या संकल्पनेचा सहजासहजी स्वीकार झाला. परंतु आपल्या समाजात ही संकल्पना पचनी पडायला थोडा अवधी लागला. नात्याचा असाच एक नवीन प्रकार पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहे. तो म्हणजे ‘पॉलीअमॉरी’. एक स्त्री आणि एक पुरुष ही आपल्यासाठी जोडप्याची व्याख्या. परंतु ‘पॉलीअमॉरी’ संकल्पनेत दोन पुरुष आणि एक स्त्री किंवा दोन स्त्रिया आणि एक पुरुष असे एकत्र राहतात. सामंजस्याने स्वीकारलेल्या या नात्याला आपला समाज किती मान्य करेल, हा एक चर्चेचा विषय असला तरी भारतीयांसाठी हा प्रकार काही नवीन नाही. कारण भारतीय महाकाव्यांपैकी एक असलेल्या महाभारतात द्रौपदीला पाच नवरे होते. त्यामुळे ही संकल्पना फार आधीपासूनच आपल्याकडे प्रचलित आहे. याच ‘पॉलीअमॉरी’ संकल्पनेवर आधारित एक नवीकोरी वेबसिरीज ३१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतेयं. ‘सोप्पं नसतं काही’  असे या वेबसीरिजचे नाव असून त्याचे दिग्दर्शन मयुरेश जोशी यांनी केलं आहे. या वेबसिरीजमध्ये मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नुकताच ‘सोप्पं नसतं काही’ चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यात मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजीत असे दोन पुरुष दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात नेमके काय होते? आता मृण्मयी या दोघांबरोबर राहणार का? की आणखी काही पर्याय निवडणार, याची उत्तरे वेबसिरीज पाहिल्यावरच मिळतील.

 


हेही वाचा – अण्णा, शेवंता, सुशल्या पुन्हा येतायंत, ‘रात्रीस खेळ चाले ३’ च्या चित्रीकरणास सुरुवात

First Published on: August 8, 2021 3:11 PM
Exit mobile version