Vaishali Mhade: माझ्या हत्येचा कट रचला जातोय, गायिका वैशाली माडेची खळबळजनक पोस्ट

Vaishali Mhade:  माझ्या हत्येचा कट रचला जातोय, गायिका वैशाली माडेची खळबळजनक पोस्ट

Vaishali Mhade: माझ्या हत्येचा कट रचला जातोय, गायिका वैशाली माडेची खळबळजनक पोस्ट

 Vaishali Bhaisane Mhade: महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली माडे यांची खळबळजनक पोस्ट सध्या चर्चेत आलीय. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. माझ्या जिवाला धोका आहे असल्याची भिती वैशाली माडे यांनी व्यक्त केली आहे. फेसबुकवर खळबळजनक पोस्ट लिहित वैशाली यांनी हा खुलासा केला आहे. पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

वैशाली यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे, काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. वैशालीच्या या पोस्टनंतर एकच खळबळ उडाली असून ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

वैशाली माडे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याकडे सध्या विदर्भाचे विभागीय पद देण्यात आले आहे. वैशाली माडे या एक उत्तम गायिका आणि राजकीय व्यक्ती आहेत. त्यांना अशा प्रकारच्या धमक्या येत असतील तर ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. दोन दिवसांनी वैशाली माडे पत्रकार परिषद घेऊन कोणता गौप्यस्फोट करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वैशाली यांच्या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय. ‘ताई तुम्ही काळजी करू नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे’, असे म्हटले आहे. ‘घटनेची पोलिसांत तक्रार करा’, असे सल्ले देखील अनेकांनी दिले आहेत. एकंदरीतच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याविषयीची काळजी कमेंटमध्ये व्यक्त केली आहे.

२००९मध्ये झी मराठीच्या ‘सा रे ग म प’ च्या त्या विजेत्या ठरल्या होत्या. सा रे ग म प ची विजेती झाल्यानंतर वैशाली यांच्या करिअरची दमदार सुरूवात झाली. मराठी सह हिंदी सिनेमातही त्यांनी गाणी गायली आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी सिनेमात वैशाली यांचे गाणे चांगलेच गाजले होते. त्याचप्रमाणे कलंक सिनेमातही त्यांनी गाणी गायली. हिंदी टेलिव्हिजनवरील सिंगिंग शोमध्ये परिक्षक म्हणून काम केले. वैशाली माडे मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या.


हेही वाचा – Gangubaiची कथा ऐकून पळून गेली होती आलिया, भन्साळींवर आली होती रडण्याची वेळ

First Published on: February 18, 2022 12:48 PM
Exit mobile version