‘भूल भुलैया २’ या चित्रपटाचा फस्ट लूक रिलीज

‘भूल भुलैया २’ या चित्रपटाचा फस्ट लूक रिलीज

२००७ मध्ये रिलीज झालेला अक्षय कुमारचा ‘भूल भुलैया’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर कायस्वरुपी छाप पाडला आहे. एका गूढ कथेला विनोदी किनार देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि विद्या बालन हे दोघे प्रमुख भूमिका साकारताना दिसले होते. आपल्या विनोदी शैलीने अक्षय कुमारने अफलातून अभिनयाची झलक या चित्रपटात दाखवली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अखेर ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाचा फस्ट लूक रिलीज झाला आहे.

या चित्रपटाचा पोस्टरमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन पाहायला मिळत आहे. या ‘भूल भुलैया २’ मध्ये खिलाडी अक्षय कुमारच्या ऐवजी कार्तिक आर्यन या चित्रपटातून दिसणार आहे. कार्तिक हा हुबेहुबे अक्षय कुमारच्या स्टाइलमध्ये दिसत असल्यामुळे पोस्टरमध्ये त्याला ओळखणंही कठीण आहे. कार्तिक पिवळ्या रंगाचे धोतर आणि कुर्त्यामध्ये दिसत आहे. तसेच त्याने त्यावर रुद्राक्ष माळ आणि ब्रेसलेट घातलं असून डोक्यावर पिवळ्या रंगाच्या कपडा बांधला आहे. कार्तिक या लूकमध्ये हुबेहुबे अक्षय कुमारसारखा दिसत आहे.

तसेच दुसऱ्या लूकमध्ये कार्तिकच्या चहू बाजूंनी मानवी सांगाडे दिसत आहे.

निर्माता भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी ‘भूल भुलैया २’ चा फस्ट लूक सोशल अकाउंटवरुन शेअर केला आहे. तसेच ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बाज्मी करत आहेत. ‘१३ वर्षांनंतर… द हॉन्टिंग कॉमेडी रिटर्न्स’ असं कॅप्शन या चित्रपटाचं पोस्ट रिलीज करताना देण्यात आलं आहे.

या चित्रपटच्या प्रदर्शनाची तारिखही पोस्टरवर जाहीर करण्यात आली आहे. ३१ जुलै २०२० रोजी ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालतो की नाही हे येत्या काळात कळेल.

First Published on: August 19, 2019 4:50 PM
Exit mobile version