राजपाल यादव दुसऱ्यांदा भूलभुलैय्यात

राजपाल यादव दुसऱ्यांदा भूलभुलैय्यात

राजपाल यादव दुसऱ्यांदा भूलभुलैय्यात

बॉलिवूडच्या आजवरच्या सर्वाधिक गाजलेल्या विनोदी चित्रपटांपैकी भूलभुलैय्या हा एक आहे. एका राज घराण्यातल्या घटनेवर आधारित हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता या चित्रपटाचा सिक्वलही येत आहे. या सिक्वलमध्ये आधीच्या भूलभुलैय्यामधला अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

नटवर हे भूलभुलैय्या या चित्रपटातले एक धमाल पात्र

भूलभुलैय्या या चित्रपटातले एक धमाल पात्र होते नटवर उर्फ छोटा पंडित. ही खरंतर चित्रपटातली एक छोटी व्यक्तीरेखा होती. पण, या व्यक्तिरेखेच्या धाटणीमुळे आणि धमाल संवाद – प्रसंगामुळे ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. त्यामुळे ही भूमिका साकारणारा अभिनेता राजपाल यादव भूलभुलैय्याच्या सिक्वलमध्येही दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनिस बझमी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून भूषण कुमार यांची निर्मिती असणार आहे. ‘भूल भुलैया २’ मध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेता कियारा आडवाणी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

हा चित्रपट भूलभुलैय्याचा दुसरा भाग असला तरी कथेत कोणतेही साम्य असणार नाही. तसेच याची कथा मानसिक आजाराच्या विषयावर नसून हा एक हॉरर ड्रामा असणार आहे. तसेच ‘भूलभुलैय्या २’ ची कथा तिथूनच सुरु होईल जिथे पहिल्या कथेचा शेवट झाला आहे.


हेही वाचा – ‘पैसे देऊनही असे स्टंट करू शकले नसते’


 

First Published on: February 23, 2020 4:07 PM
Exit mobile version