भूमी सोशल मीडियावर ट्रोल; ‘पाडव्या’ला दिल्या ‘संक्रांती’च्या शुभेच्छा

भूमी सोशल मीडियावर ट्रोल; ‘पाडव्या’ला दिल्या ‘संक्रांती’च्या शुभेच्छा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढी पाडव्याचा संपुर्ण देशात एकच उत्साह पाहायला मिळत आहे. सर्व साधारण माणसांपासून राजकारणातील तसेच कलाकार मंडळींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर गुढीपाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुढीपाडव्याला पाडव्याच्या शुभेच्छा न देता संक्रातीच्या शुभेच्छा एका अभिनेत्रीने दिल्याने ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर.

सोशल मीडियावर भूमी चांगलीच ट्रोल 

मराठी सणांपैकी महत्वाचा मानला जाणाऱ्या या पाडव्याच्या दिवशी पारंपारिक मराठमोळ्या पोशाखातील आपला फोटो ट्विटरवर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत गुढीपाडव्याच्या दिवशी मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा पारंपारिक वेशातील फोटो शेअर करताना त्या फोटोला ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे कॅप्शन दिले आहे.
त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

‘मकरसंक्रांत’ व ‘गुढीपाडवा’ यातील फरक समजतो का?

मराठी कलाकार असून देखील मराठी सणांची माहिती नसल्याने नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला सोशल मीडियावर जोरदोर टीका करत चांगलेच ट्रोल केले आहे. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रीया करत ‘मकरसंक्रांत’ आणि ‘गुढीपाडवा’ सणातील फरक समजतो की नाही असा प्रश्न देखील तिला केला आहे.

मराठी मुलगी म्हणे…

हा महाराष्ट्रीयन साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना तिने #MarathiMulgi असा हॅशटॅग वापरल्याने सोशल मीडिया युजर्सने मराठी सणांची माहिती तर नाहीच आणि मराठी मुलगी स्वतःला मानते. यासोबत इतर सणांच्या आधीच शुभेच्छा तिच्या या पोस्टवर करत खोचक प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी केल्या असून भूमी चांगलीच ट्रोल झाली आहे.

First Published on: April 6, 2019 1:52 PM
Exit mobile version