अनुप आणि जसलीनच्या जोडीवर नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिक्रीया!

अनुप आणि जसलीनच्या जोडीवर नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिक्रीया!

अनुप जलोटा आणि जसलीन

बिग बॉस १२ च्या घरात कोणते कलाकार, कोणत्या जोड्या असणार हे आता रिवील झालं. काल(१६सप्टेंबर) बिग बॉस १२ चा हा सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला, आणि कायमच वादग्रस्त ठरलेला बिग बॉस १२ ची सुरूवात झाली. बिग बॉसचा होस्ट सलमान खानने सगळ्या घरातील सदस्यांची त्याच्या हटके अंदाजात ओळख करून दिली. यासिझनचे सदस्यबघून हे पर्व नक्कीच चर्चेत राहणार असं दिसतय.

या सगळ्यांमध्ये चर्चेत राहणार ती म्हणजे गायक अनुप जलोटा आणि त्याची गर्लफ्रेंड जसलीन माथूर. या जोडीला सलमानने बिग बॉसच्या घरातील सदस्य म्हणून ओळख करून दिली, आणि सगळ्यांच्या भुवया उंचवल्या. कारण अनुप जलोटा हे ६५ वर्षांचे आहेत. तर त्यांची गर्लफ्रेंड जसलीन ही केवळ २८ वर्षाची आहे. या दोघांनी आपल्या प्रेमाची कबूली काल नॅशनल टेलेव्हीजनवर दिली. अनुप जलोटा आपल्या पेक्षा ३७ वर्षांनी लहान असणाऱ्या बोल्ड जसलीनबरोबर गेले तीन वर्ष डेट करतायत. आजपर्यंत या दोघांनी आपलं नात सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. अखेर बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना यांनी आपल्या प्रेमाची कबूली दिली.

मात्र त्यांच्या जोडीवर नेटीझन्सी भन्नाट प्रतिक्रीया दिला आहेत. काहींनी या जोडीचं कौतुक केलं तक काहींनी मात्र निगेटीव्ह प्रतिक्रीया दिल्या.

First Published on: September 17, 2018 2:27 PM
Exit mobile version