बिग बॉस १३ चा स्पर्धक हिंदुस्थानी भाऊचे Instagram Account बंद, कारण…

बिग बॉस १३ चा स्पर्धक हिंदुस्थानी भाऊचे Instagram Account  बंद, कारण…

प्रसिद्ध युट्युबर विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ

बिग बॉस १३ मधील स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास फाटक आपल्या देसी स्टाईलसाठी प्रसिध्द होता. हिंदुस्थानी भाऊचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे. कारण भाऊच्या या अकाऊंटला कविता कौशक यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी रिपोर्ट केला होता. खरं तर, हिंदुस्थानी भाऊंचा एक आक्षेपार्ह व्हिडिओवर सर्वात आधी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी रिपोर्ट केलं होती. कुणालने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांना यांना टॅग केले होते. हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुणालने केला होता.

कुणालचे हे ट्विट एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिक आणि फराह अली खान  यांच्यासह अनेकांनी  अक्षेपार्ह आहे असे नोंदवले आहे. कुणाल यांनी लिहिले आहे – हिंसाचार करणे हा गुन्हा आहे. द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे.

हिदुस्थानी भाऊ

बिग बॉस १३चा स्पर्धक असणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला आपल्या देसी अंदाचामुळे मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली. यावेळी घरातील अनेक सदस्यांशी त्याच चांगलं बॉण्डींग होतं. हिंदुस्थानी भाऊ सोशल मीडियावर पाकिस्तान विरोधात बनवलेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आला. त्यामुळे त्याला बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली.


हे ही वाचा – ‘ती राष्ट्रपती आहे का?’, कंगना- नसरूद्दीन शहांमध्ये रंगले ट्विटरवॉर!


First Published on: August 21, 2020 10:14 AM
Exit mobile version