Video: माहिराला पारसने केले किस; व्हिडिओ झाला व्हायरल

Video: माहिराला पारसने केले किस; व्हिडिओ झाला व्हायरल

बिग बॉस १३ हा कार्यक्रम या ना त्या कारणाने नेहमीच वादात असतो. त्यामुळे टेलिव्हीजनच्या दुनीयेत बिग बॉस हिंदीची नेहमीच चर्चा असते. बिग बॉस १३ मधील सदस्यांचे होणारे भांडण असो वा त्यांच्यात फुलत जाणारी मैत्रीचे साक्षीदार कायम प्रेक्षक असतात. त्याचप्रमाणे घरातील सदस्यांची केमिस्ट्रीही बदलत असते. कधी कोण कोणाच्या गळ्यात गळे घालेल तर कधी कोणी भांडण उकरून काढेल हे काही सांगता येत नाही. गेले काही दिवस घरात पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा यांच्यात केमिस्ट्री बघायला मिळते.

पारस आणि माहिरा घराच्या गार्डन एरियामध्ये गप्पा मारत बसले होते. यावेळी अचानक पारस माहिराला किस करतो. यावेळी पारस माहिराला म्हणतो तो मला खूप लवकर जज करायला सुरूवात केलीस, त्यावर माहिरा त्याला म्हणते मी सुरूवातीला सिरीयस नव्हते. अस म्हणत ते दोघे जून्या गोष्टींवर बोलायला सुरूवात करतात. यावेळी पारस माहिराला किस करतो. यावेळी माहिरा म्हणते पारस तू काय केलेस यावर माहिराला पारस पुन्हा एकदा किस करतो. त्यामुळे माहिरा हैराण होते. ते एकमेकांच्या मस्करीत थोबाडीतही मारतात.

पारस- माहिराचा हा व्हिडीओ सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. मला समजत नाही की पारस बिग बॉसच्या घरात गेम खेळत आहे की गेली तीन वर्षे माझ्यासोबत खेळ खेळत आहे हे मला माहित नाही. अशी प्रतिक्रीया पारसची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीने दिली आहे.

First Published on: December 24, 2019 5:54 PM
Exit mobile version