ड्रामा क्वीन शिवानीने दिली बिग बॉसला धमकी

ड्रामा क्वीन शिवानीने दिली बिग बॉसला धमकी

शिवानी सुर्वे बिग बॉस सिजन २

बिग बॉस सीझन २ मध्ये नेहमीच काहीना काही धडाकेबाज घडत असतं. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन खेळाडूंमध्ये भांडणं होत असतात. पण यावेळी बिग बॉस सीझन २ मध्ये काहीसं वेगळं घडलं आहे. पहिल्या दोन आठवड्यात उत्साहाने खेळाणाऱ्या शिवानीचा उत्साह कुठे तरी हरवल्या सारखा दिसून येत आहे. तिला मानसिक आणि शारिरीक त्रास होत असल्यामुळे तिचा उत्साह कमी झाल्याचे ती सांगत आहे.

कालच्या एपिसोडमध्ये शिवानीला त्रास होत असल्यामुळे ती बिग बॉसला सतत तिला कन्फेशन रुममध्ये बोलवण्यासाठी विनंती करत होती. कारण तिचं असं म्हणं होत की, मला मानसिक आणि शारिरीक त्रास होतोय आणि मला घराबाहेर जायचं आहे, अशी तिने बिग बॉसला विनंती केली होती. तसेच जोपर्यंत बिग बॉस माझं ऐकणार नाहीत तोपर्यंत मी कोणाताही टास्क करणार नाही आणि मी त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करेन अशी तिने धमकी दिली.

या अगोदर हिंदी बिग बॉसमध्ये असंच काहीस राहुल महाजन याने केलं होतं. त्याला बिग बॉसचे घर सोडून जायचे होते. म्हणून राहुल महाजनने घराबाहेर जाण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले होते.

या आठवड्यात शिवानीला बरं नाही असं कळल्यावर बिग बॉसने तिला तातडीने कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचा खुलासा बिग बॉसने केला. पण तिचे रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे तिला पुन्हा घरात आणले. त्याचदरम्यान तिला तिच्या प्रियकराशी फोनवर बोलण्याची संधी मिळाल्याचे शिवानीने सांगितले. तिने तिचा प्रियकर अजिंक्यला असे सांगितले की, मला आता बिग बॉसच्या घरात नाही राहायचं आहे. ह्या सर्व गोष्टी ती इतर लोकांना सांगत होती. तिला ह्या सर्व गोष्टी बिग बॉसने गुप्त ठेवण्यास सांगितले होते. पण तिने बिग बॉसचे ऐकले नाही.

काही वेळानंतर बिग बॉसने शिवानी आणि नेहाला कन्फेशन रुममध्ये बोलावलं. कायदेशीर पद्धतीने शिवानीला घराबाहेर आणलं जाईल, असं बिग बॉसने सांगितलं. तिने कायद्याची भाषा केल्यामुळे बिग बॉसने हा निर्णय घेतला. पण तिने बिग बॉसला ‘कायदेशीर पद्धतीने काही करु नका’ अशी विनंती केली आणि बिग बॉसची माफी मागितली. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये शिवानी घराबाहेर जाणार की नाही हे कळेल.

First Published on: June 13, 2019 10:01 AM
Exit mobile version