Birthday Special: गॅरेजमध्ये काम करणाऱ्या गुलजार यांची अशी झाली बॉलिवूडमध्ये एंट्री!

Birthday Special:  गॅरेजमध्ये काम करणाऱ्या गुलजार यांची अशी झाली बॉलिवूडमध्ये एंट्री!

कवी, लेखक, गीतकार, निर्माता म्हणून ओळखले जाणारे गुलजार आज त्यांचा ८६वा वाढदिवस साजरा करीत आहेत. गुलजारचे खरे नाव संपूर्ण सिंह कालरा असे आहे. त्याच्या नावाबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ रोजी पंजाबच्या झेलम येथे झाला. जे आता पाकिस्तानात आहे. फाळणीनंतर गुलजार अमृतसरला आले होते. गुलजार हे अमृतसरला फार रमले नाही आणि ते मुंबईत आले. त्यांना सुरुवातीपासूनच शायरी, कविता आवडत होती. वेळ मिळाल्यावर ते कविता कागदावर उतरवायचे.

मुंबईत आल्यानंतर गुलजार यांनी रोजीरोटीसाठी गॅरेजमध्ये काम करण्यास सुरवात केली. गॅरेजमध्ये वेळ मिळाल्यावर ते कविता लिहायचे आणि त्यांचा छंद जोपासायचे. १९६१ मध्ये विमल रायच्या सहाय्यक म्हणून गुलजार यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांनी हृषिकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांच्यासोबतही काम केले. यावेळी त्यांना बंदिनी चित्रपटात गीत लिहिण्याची संधी मिळाली. बंदिनी चित्रपटात त्यांनी ‘मोरा गोरा अंग लेई ले’ लिहिले. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. गुलजार यांचे पहिले गाणे सुपरहिट होते. सर्वांना हे गाणे खूप आवडले. इथूनच गुलजार यांनी जे लिहिले ते सर्वांच्या मनात घर करून गेले.

गुलजार ने तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं में, आपकी आंखों में कुछ महके हुए से राजपासून अनेक गाणे लिहिले आहेत. गुलजार यांनी कोशिश, परिचय, आंधी, मौसम, मीरा, किताब, माचिस असे अनेक उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

गुलजार यांनी त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार जिंकले आहेत. गुलजार यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके, राष्ट्रीय पुरस्कार यासह २१ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.


Video : मुख्यमंत्री साहेब, इच्छा मरणाला परवानगी द्या.. लोककलावंताची आर्त हाक!
First Published on: August 18, 2020 4:14 PM
Exit mobile version