Ram Kadam on Tandav : सैफचा तांडव ‘त्या’ सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात

Ram Kadam on Tandav : सैफचा तांडव ‘त्या’ सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात

तांडव वेबसिरीज

तांडव ही वेबसिरीज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. मात्र ही वेब सिरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वेब सीरिजमध्ये भगवान शंकर आणि राम या हिंदू देवतांवर आधारित एक खास सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमुळे सोशल मीडियावर वेब सिरिजवरून नवीन वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते राम कदम यांनी यावर आक्षेप घेतला आहे. वेब सिरिज विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत राम कदम (Ram Kadam) यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ‘तांडव वेब सिरिजमध्ये झालेल्या हिंदू देव देवतांच्या विटंबनेच्या संदर्भात हिंदूच्या दुखावलेल्या भावनेविरोधात मी या वेब सिरिजचे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता यांच्या विरोधात FIR दाखल करण्यासाठी घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाण्यात १२:३० वाजता जाणार आहे’, असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.


राम कदम यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी तांडव (Tandava) वेबसिरिजच्या विरोधात ट्विट केले आहे. ‘तांडव ही वेबसिरिज दलित विरोधी आहे. ती हिंदूच्या भावनाही भडकवणारी आहे. या विरोधात माहिती आणि प्रसारण मंत्री जावडेकरांना करांना लिहावी’, असे ट्विट भाजप नेता कपिल मिश्रा यांनी केले आहे. ट्विट करत त्यांनी मंत्रालयाचा ईमेल आयडीही दिला आहे. तांडव वेबसिरिजच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक संतप्त कमेंट येत आहेत. वेब सिरिजच्या माध्यमातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. ट्विटरवर #BanTandavNow हा हँशटॅगही ट्रेन्ड होत आहेत.

काय आहे तो सीन?

तांडव वेबसिरिजमध्ये (Tandav Webseries) अभिनेता जीशाय अयूब हा नारदाच्या व्यक्तिरेखा असणाऱ्या व्यक्तीला म्हणतो की, ‘भगवान काहीतरी करा. सोशल मीडियावर भगवान रामाच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. मला वाटतयं की आपण काहीतरी वेगळी रणनीती तयार करायला हवी. त्यावर जीशान असे म्हणतो की, मग काय करू, बदलू का? त्यावर त्याला नारद म्हणतो की, भगवान तुम्ही खूपच भोळे आहात.’

तांडव वेबसिरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान मुख्य भुमिकेत आहे. त्याचबरोबर डिंपल कापाडिया, गौहर खान, जीशान अयबू, सुनिल गोव्हर यांचा अभिनय पहायला मिळतो. या वेब सिरिजचे खास आकर्षण म्हणजे ही संपूर्ण वेब सिरिज सैफ अली खानच्या प्रसिद्ध अशा पतौडी पॅलेसमध्ये शुट करण्यात आली आहे.


हेही वाचा – महेश मांजरेकर यांच्यावर व्यक्तींला मारहाण केल्याचा आरोप, तक्रार दाखल

First Published on: January 17, 2021 1:44 PM
Exit mobile version