इतिहास माहित आहे म्हणणाऱ्या सैफला तैमूरच्या नावावरून केले ट्रोल!

इतिहास माहित आहे म्हणणाऱ्या सैफला तैमूरच्या नावावरून केले ट्रोल!

गेल्या दोन दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानने तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता मीनाक्षी लेखीने भारतीय इतिहासाबद्दल सैफने केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. यावेळी लेखी यांनी तीन वर्षाच्या तैमूरच्या नावावरून सैफवर निशाणा साधला आहे.

‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इतिहासाशी मी सहमत नाही असं खुद्द चित्रपटातील अभिनेता सैफ अली खाननेच सांगितले आहे. चित्रपट चालावा यासाठी या चित्रपटात राजकीय कथा बदलून दाखवण्यात अली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. असं विधान एका मुलाखती दरम्यान सैफने केले आहे. यावर मीनाक्षी लेखी यांनी ट्विट करत तैमूरच्या नावार निशाणा साधला आहे.

मीनाक्षी लेखी ट्वीटमध्ये म्हणतात, तुर्कमध्ये तैमूरला क्रूर मानले जाते. पण काही जण आपल्या मुलाचे नाव तैमुरच्या नावावरून ठेवतात.

या आधीही अनेकवेळा तैमूरच्या नावावरून अनेक प्रश्न विचारण्यात आले. या आधी दक्षिणपंथी विचारधारा असणाऱ्या लोकांनी ट्रोल केले होतो. या आधी सैफने तैमुरच्या नावाबाबत खुलासा केला आहे. सैफ म्हणालेला, मला आणि माझ्या बायकोला हे नाव खूप आवडलं. तुर्की साम्राज्याबद्दल मला माहिती आहे. तैमूर हे प्राचीन फारसी नाव आहे. ज्याचा अर्थ लोहा असा आहे.

First Published on: January 21, 2020 3:39 PM
Exit mobile version