‘सेक्रेड गेम्स’चे दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात गुन्हा दाखल

‘सेक्रेड गेम्स’चे दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात गुन्हा दाखल

दिग्दर्शक अनुराग कश्यप

नेटफ्लिक्सवर धुमाकुळ घालणाऱ्या दमदार वेबसीरीज ‘सेक्रेड गेम्स’मधील एका सीनवरून वादंग उठला आहे. या सीनमुळे धार्मिक भावना दुखावल्या केल्यामुळे ‘सेक्रेड गेम्स’चे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी वेब सीरीज ‘सेक्रेड गेम्स (Sacred Games)’ च्या माध्यमातून शीख बांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप अनुराग कश्यपवर केला आहे. याप्रकरणी तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी अनुराग कश्यपविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

शीख ककारचा (केस, कंगवा, लोखंडी किंवा स्टीलचे कडे, लांब विजार, किरपान हे पाच ककार) अपमान केल्यामुळे संसद मार्ग पोलिस ठाण्यात मी ‘सेक्रेड गेम्स’चे दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल केली आहे. वेब सीरीजमध्ये एका सीनमध्ये एका शीख व्यक्तीची भूमिका साकारत असलेल्या सैफ अली खानला आपले हातातील कडे फेकताना दाखवण्यात आले आहे. हातातील कडे शीख समुदायाच्या पवित्र पाच ककारांपैकी एक आहे.

तेजिंदरपाल सिंह बग्गा यांच्याबरोबरच अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनीही अनुराग कश्यपला इशारा दिला आहे. शीख धर्मियांच्या पाच ककारांपैकी एक कड्याचा अपमान झाल्याबद्दल सिरसा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते ‘सॅक्रेड गेम्स-२’ च्या या क्लिपबद्दल सांगत म्हणाले की, ‘आपल्या प्रोजेक्टमध्ये केवळ खळबळ पसरवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी शिख समुदायाचे नकारात्मक पात्र सादर करण्यापूर्वी अनुराग कश्यप कमीत कमी हिंदू आणि शीख धर्मांबद्दल वाचून घे.’ तसेच जर अनुराग कश्यपने धार्मिक भावनांशी खेळ करणे बंद केले नाही तर त्याला तुरुंगात नेऊन सोडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

First Published on: August 21, 2019 3:02 PM
Exit mobile version