काळवीट शिकार प्रकरण : राज्य सरकार हायकोर्टाच्या निर्णयाला आवाहन देणार

काळवीट शिकार प्रकरण : राज्य सरकार हायकोर्टाच्या निर्णयाला आवाहन देणार

सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम (सौजन्य-झी न्यूज)

राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणी हाय कोर्टाने दिलेल्या निर्णयाला राज्यसरकार आवाहन देणार आहे. त्यामुळे अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शनिवारी राज्य सरकारने राजस्थान हाय कोर्टाच्या निर्णयाला आवाहन देणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तब्बू आणि सैफ अली खान या कलाकारांना हाय कोर्टाने दिलासा दिला होता. सुनावणी दरम्यान कोर्टाने या कलाकारांनी कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. त्याच निर्णयाच्या विरोधात आता राज्य सरकारने पाऊल उचलतं याला आवाहन देणार असल्याचे म्हटले आहे.


सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा

या प्रकरणातील आरोपी अभिनेता सलमान खान याच्यासह इतर सर्व कलाकारांवर खटला दाखल करण्यात आला होता. तब्बल पाच महिन्यांपूर्वी या प्रकरणी हाय कोर्टात सुनावणी पार पडली होती. त्यावेळी सलमान खान व्यतीरिक्त इतर सर्व कलाकारांची निर्दोष सुटका कोर्टाने केली होती. तर सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

काय आहे काळवीट शिकार प्रकरण

‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. चित्रीकरणादरम्यान जोधपूरनजीकच्या कनकनी खेड्यातील भगोडा की धानी येथे १ आणि २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप आहे. शिकारीच्या वेळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे तिथे उपस्थित होते. त्या रात्री सर्व आरोपी एका जिप्सी कारमध्ये होते आणि सलमान ती चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमाने गोळ्या झाडून त्यांपैकी दोघांना ठार मारले, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या प्रकरणात सलमान विरोधात पुरावे देखील आहेत, असे सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते.

First Published on: September 15, 2018 4:47 PM
Exit mobile version