चाहत्यांचे प्रेम पाहून अमिताभ बच्चन झाले भावूक, म्हणाले….

चाहत्यांचे प्रेम पाहून अमिताभ बच्चन झाले भावूक, म्हणाले….

बिग बींवर होते ९० कोटींचे कर्ज, पैसे मागण्यासाठी लोक घरी यायचे

जेव्हापासून बॉलिवूचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तेव्हापासून संपूर्ण देश त्यांची प्रकृती लवकर ठिक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल आहे. पण यादरम्यान सतत ते आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकृतीबाबत अपडेट देत असतात.

दरम्यान अमिताभ बच्चन यांनी काल रात्री एक ट्विट केले आहे. त्यांनी भावूक अंदाजात चाहत्यांचे आभार मानले आहेत.  ‘एसएमएस (SMS), ब्लॉग आणि इन्स्टाग्राम अशा सोशल माडिया प्लॅटफॉर्मवरून मला तुमचे खपू प्रेम मिळत आहे. माझ्या कृतज्ञतेला कोणतीही सीमा नाही. रुग्णालयातील प्रोटोकॉल थोडे कडक आहेत. यामुळे मी आणखी काही बोलू शकत नाही. तुम्हा सर्वांना माझे प्रेम’, अशा अंदाजात त्यांनी चाहत्यांचे आभार मानाले आहेत. तसेच त्यांनी काल ट्विटरवर विठ्ठल-रखुमाईचा फोटो शेअर करून ‘ईश्वराच्या चरणी समर्पित’ असे लिहिले होते. अभिनेता अभिषेक बच्चनने देखील हाथ जोडून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांसोबत विचार देखील शेअर करत असतात. यामध्ये त्यांनी जीवनाचा सार सांगितला होता. अमिताभ बच्चन यांनी लिहिले असे की, ‘सभी से ईर्ष्या, घृणा करने वाले, असंतोषी, क्रोधी, सदा संदेह करने वाले और पराये आसरे जीने वाले ये छः प्रकार के मनुष्य हमेशा दुखी रहते हैं. अतः यथा संभव इन प्रवृत्तियों से बचना चाहिए.’ यामध्ये त्यांनी सहा प्रकारच्या दुःखी व्यक्तीबद्दल सांगितले आहे. तसेच त्यांनी नकारात्मक प्रवृत्तींपासून बचाव करण्याचा सल्ला देखील दिला आहे.


हेही वाचा – सुशांतच्या स्मरणार्थ एकताने सुरू केला ‘पवित्र रिश्ता फंड’


 

First Published on: July 17, 2020 4:22 PM
Exit mobile version