Video: बाबा निरालाची डार्क साइड येणार समोर, ‘आश्रम चॅप्टर २’चा ट्रेलर रिलीज

Video: बाबा निरालाची डार्क साइड येणार समोर, ‘आश्रम चॅप्टर २’चा ट्रेलर रिलीज

अभिनेता बॉबी देओलची वेबसीरिज ‘आश्रम चॅप्टर २’चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या ‘आश्रम चॅप्टर २’मध्ये बॉबी देओलचा म्हणजेच काशीपुरचा बाबा निरालाच्या आश्रमची डार्क साइड दाखवली आहे. पहिली सीरिज जिथे संपली होती तिथूनच दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात झाली आहे. पूर्ण ट्रेलरमध्ये बॉबी देओलचा खरा चेहरा समोर येताना दिसत आहे.

सध्या ‘आश्रम चॅप्टर २’चा ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. या ट्रेलरला ४ तासांत ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ४७ हजारांहून अधिक लाईक्स मिळले आहेत. आश्रमच्या पहिल्या भागात बॉबी देओल आस्थेच्या नावाखाली निरपराध लोकांच्या भावनांशी खेळत असल्याचे दाखवले. प्रकाश झा यांनी दिदर्शित केलेला ‘आश्रम चॅप्टर २’ ११ नोव्हेंबरला फक्त एमएक्स प्लेअर (MX Player) रिलीज होणार आहे.

याबाबत बॉबी देओल म्हणाला की, ‘या सीरिजच्या पहिल्या अध्यायाला एवढे मोठे यश मिळाल्याबद्दल मी प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो. एवढेच नाहीतर पुढील अध्यायात काशीपूरच्या बाबा निरालाचे रुप आणि प्रखर शक्ती दिसली आहे. जिथे तो आपल्या फायद्यासाठी प्रत्येक नियम बदलतो आणि आपल्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येक नियमात बदल करतो. इतकेच नाही तर असे काही दाखवले गेले आहे की, ज्याची कोणीच कल्पना देखील करू शकणार नाही.’


हेही वाचा – ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा ‘धर्मेश’कडे


 

First Published on: October 29, 2020 4:16 PM
Exit mobile version