‘लगान’ फेम अभिनेते जावेद खान यांचे निधन

‘लगान’ फेम अभिनेते जावेद खान यांचे निधन

बॉलीवू़डमधील ज्येष्ठ अभिनेता जावेद खान (70) यांचे आज मुंबईत दिर्घ आजाराने निधन झाले. जावेद खान यांना वर्षभरापासून श्वसनाचा त्रास होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना सांताक्रूझ येथील सूर्या नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

खान यांचे दोन्ही फुफ्फुस निकामी झाले होते. यामुळे गेले वर्षभर ते अंथरुणातच होते. खान यांनी हिंदी चित्रपटात विविध छटांच्या भूमिका साकारल्या होत्या. तब्बल १५० चित्रपटात त्यांनी काम केले होते. लगान’, ‘वन्स अपॉन अ टाइम’, ‘अंदाज अपना-अपना’ आणि ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील त्यांचा अभिनयाची जोरदार चर्चाही झाली होती. सडक २ मध्ये त्यांनी पक्याची भूमिका केली होती. तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्येही ते झळकले होते. तसेच जावेद इप्टाचे सक्रिय सदस्यही होते. खान यांचे जवळचे मित्र अखिलेंद्र मिश्रा यांनी कान यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. दरम्यान, ओशिवरा येथील त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला.

First Published on: February 14, 2023 8:31 PM
Exit mobile version