कमाल खानची पुन्हा वायफळ बडबड

कमाल खानची पुन्हा वायफळ बडबड

कमाल खान

करोना व्हायरसने आतापर्यंत तबब्ल २० हजार हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. हा व्हायरस केवळ चीन पुरताच केवळ मर्यादीत राहीला नसून यात तब्बल २५ देशांचा समावेश आहे. या व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले असले तरीही भारतात याचा फटका बसला नाही आहे. मात्र, ‘भारतातही करोनाची लागण व्हावी’, असे धक्कादायक वक्तव्य अभिनेता कमाल खानने केले आहे. ऐवढ्यावरच न थांबता कमाल खान याने करोनाची लागण भारतीयांना देखील व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.

काय आहे ट्विटमध्ये?

कायम आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणारा बिगबॉस फेम अभिनेता कमाल खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. यावेळी करोना व्हायरस संबंधीत एक ट्विट त्यांनी केले आहे. कमाल खान उर्फ केआरके म्हणाला आहे की, ‘करोना व्हायरस लवकरात लवकर भारतात यावा अशी प्रार्थना मी देवाकडे करतो आहे. असे झाले तर देशातील हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन असे सर्वच जन एकत्र येतील आणि करोना व्हायरसशी झुंज देतील’, अशा ट्विटमुळे केआरके चर्चेचा विषय ठरला आहे.

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

कमाल खान उर्फ केआरकेचे हे ट्विट आता सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत असून थोड्याच वेळात अनेक युजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘भारतीयांना एकत्रित येण्यासाठी करोनाची गरज नाही’ तसेच ‘अशी प्रार्थना कोणी करत का?’ असा प्रश्न विचारत केआरकेच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अशा शब्दात अनेक युजर्सने रिट्विट करत केआरकेच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

 

First Published on: March 1, 2020 4:01 PM
Exit mobile version