मलायका-अर्जुनची ‘जादू की झप्पी’ व्हायरल!

मलायका-अर्जुनची ‘जादू की झप्पी’ व्हायरल!

मलायका-अर्जुनची 'जादू की झप्पी' व्हायरल!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या लव्ह लाईफमुळे खूपच चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. मलायका आणि अर्जुनचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या मिठ्ठी मग्न होऊन क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे.

मलायका अरोराने जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंड अर्जुनसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. हा फोटो शेअर करत मलायकाने लिहिले आहे की, ‘जेव्हा तू जवळपास असतोस तेव्हा कधीही कंटाळवाणे वाटत नाही.’

First Published on: December 1, 2020 6:40 PM
Exit mobile version