सोनू सूद नागपूरातील कोरोना रुग्णाच्या मदतीस आला धावून, मिळून दिला रुग्णालयात बेड

सोनू सूद नागपूरातील कोरोना रुग्णाच्या मदतीस आला धावून, मिळून दिला रुग्णालयात बेड

Sonu Sood To Host Rodies : रोडीज शोमधून रणविजय आऊट, तर सोनू सूदची एन्ट्री

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक रुग्णालयातील एकेका बेड्स, ऑक्सिजन, इंजेक्शनसाठी कोरोनाबाधितासह नातेवाईकांचा संघर्ष सुरु आहे. अशातच नागपूरातील एका गरीब रुग्णाच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद देवदूतासारखा धावून आला आहे. मुंबईत सोनू सूद स्वत: कोरोनावर उपचार घेत असताना त्याने नागपूरातील कोरोनाबाधिताला २४ तासांच्या आत मेयो रुग्णालयात बेड् मिळवून दिला.

भंडाऱ्यातील सुकळी या गावातील भाऊराव टेंभुर्णे नागपूरात मिहानमध्ये काम करतात. गेल्या सहा दिवसांपासून ते कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती हालाखीची असल्याने महागड्या रुग्णालयांमध्ये जाणे जमत नव्हते. त्यामुळे टेंभुर्णे यांचा मुलगा गेली सहा दिवस नागपुरच्या विविध रुग्णालयांमध्ये वडीलांना भर्ती करुन घेण्यासाठी धडपड करत होता. एम्स रुग्णालयापासून ते विविध रुग्णालयात वडीलांना भर्ती करुन घेण्यासंदर्भात विनवणी करुनही हाती निराशा आली.

यावेळी हताश झालेलाा टेंभुर्णे यांचा १९ वर्षीय मुलगा धनंजय याने वडीलांना रुग्णालय प्रवेश मिळावा यासाठी ट्विट केले. यावेळी ट्विटरवर त्याची भेट नागपूरातील पत्रकार प्रसन्न जकाते यांच्याशी झाली. जकाते यांनी अभिनेता सोनू सुदला याबाबतची माहिती बुधवारी सकाळी सातच्या सुमारास दिली. सूद सध्या स्वत: कोरोनावर उपचार घेत आहे असे असतानाही त्याने गरजू रुग्णाच्या ट्विटला उत्तर मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सूद यांना माहिती दिल्यावर त्यांची नागपुरातील संपूर्ण टीम दिवसभर कामाला लागत नागपुरातील विविध रुग्णालयांचा शोध घेतला. या दरम्यान काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनाही मी संपर्क साधला. त्यांच्यामुळे त्यामुळे टेंभर्णे यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली. अखेर, २४ तासांच्यात आत टेंभुर्णे यांना मेयो रुग्णालयात भरती करण्यात यश आले’, अशी माहिती जकाते यांनी दिली. दरम्यान जकाते यांनाही कोरोना विषाणूने घेरले होते, मात्र अवघ्या दोन दिवसांपूर्वी ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले होते. त्यामुळे सोनू सूदसह टेंभुर्णे यांनी आपल्यातली माणूसकी जिवंत ठेवत टेंभुर्णे यांना मदत केली.

दरम्यान टेंभुर्णे यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरु झाले आहेत. नागपूरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्यव्यवस्था अपुरी पडत आहे. यामुळे रुग्णांना खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन्स मिळणे अडचणीचे झाले आहे. अशा स्थितीत सोनू सूद यांच्या सेलिब्रिटीने स्वत: लक्ष घातल्याने एका सामान्य माणसाला उपचार मिळणे शक्य झाले.


 

First Published on: April 22, 2021 3:36 PM
Exit mobile version