बॉलीवूड मधील ‘हे’ कलाकार अभिनयाबरोबर करतात बिझनेसही

बॉलीवूड मधील ‘हे’ कलाकार अभिनयाबरोबर करतात बिझनेसही

बॉलीवूडचे 'हे' स्टार्स अभिनयाबरोबर करतात बिझनेसही

बॉलिवूडमध्ये आपलं करिअर करणे काही सोपी गोष्टी नाही. आजवर अनेकांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यातील काहीजण सफल झाले तर काही जणांनी अर्ध्यातूनच माघार घेतली. आजही बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार सिनेमा हिट करण्यासाठी मेहनत घेत आहेत. तर काही जण अभिनयाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करुन आपली नवी ओळख बनवू पाहत आहेत. बॉलिवूडमधील आताचे आघाडीचे कलाकार अभिनयासोबतच आपला साइड बिझनेस देखिल करत आहेत आणि त्यातही त्यांनी चांगले यश मिळवले. जाणून घ्या बॉलीवूडचे हे स्टार्स अभिनयाबरोबर कोणता बिझनेस करतात. (Bollywood Actors do business with acting)

अनुष्का शर्मा

बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या अभिनयासोबतच प्रोडक्शन आणि बिझनेसमध्येही सफल झालीय. नुष हा क्लोथिंग ब्रॅड अनुष्काच्या मालकीचा आहे. अनुष्काच्या क्लोथिंग स्टाईल सारखीच अनुष्का नेहमीच कूल आणि कॅज्युअल आऊटफिटमध्ये दिसून येते.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीने फिल्मी करिअरला राम राम केले असले तरी ती सध्या रिअँलिटी शोमधून दिसून येते. शिल्पा शेट्टी लोसिस सलौन अँड स्पाची ओनर आहे. भारतात अनेक ठिकाणी याचे सेंटर्स आहेत.

 

अभिषेक बच्चन

अभिनेता अभिषेक बच्चनने अभिनयात जास्त प्राविण्य मिळवले नसले तरी बिझनेसमध्ये अभिषेक खुप पुढे निघून गेला आहे. अभिषेक प्रो कबड्डी लीग जयपूर पिंक पँथर आणि इंडियन सुपर लीग फुटबॉल टीम Chennaiyin FCचा मालक आहे.

 

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा अभिनयासोबतच न्यूयॉर्कमध्ये भारतीय पारंपरिक पदार्थ मिळाणाऱ्या सोना या रेस्टॉरंटची मालक आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रियांका या स्टेस्टॉरंटसाठी काम करत आहे.

 

कतरिना कैफ

कतरिना कैफही अभिनयासोबत मेकअप लाइनमध्ये असलेल्या kay Beauty ची मालक आहे. कतरिना तिच्या सोशल मीडियावरून नेहमी तिच्या बँडचे प्रमोशन करताना दिसते.

ट्विंकल खन्ना

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने अभिनयासोबतच लिखाणा करण्यात आपले नाव कमावले आहे. अनेक वृत्तपत्रात ती कॉलम लिहिते. तिची अनेक बेस्ट सेलिंग पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आई डिंपल कापाडियासोबत द व्हाइट विंडो नावाच्या इंटीरिएर डिझाइन आणि कॅडिंल व्यवसायाची मालक आहे.

सुष्मिता सेन

अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनयासोबतच तंत्र प्रोडक्शनची मालक आहे. त्याचप्रमाणे ती ज्वेलरी रिटेल स्टोर रेनी ज्वेलर्सची देखील मालक आहे.

सुनिल शेट्टी

अभिनेता सुनिल शेट्टी बिझनेसमध्ये खूप सक्सेस झाला आहे. जिम्स, रियल इस्टेट,क्ल्बस सारख्या अनेक बिझनेसाठी काम करतो. सुनिल शेट्टी पॉपकॉर्न एंटरटेनमेंटचा मालक आहे.


हेही वाचा – Super Dancer:खट्ट्याळ शिल्पाचा हॉरर अवतार

 

 

First Published on: July 1, 2021 1:03 PM
Exit mobile version